कबड्डीपटूची हत्या; सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण : उदयनराजे

कबड्डीपटूची हत्या; सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण : उदयनराजे
udayanraje bhosale

सातारा : पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे अतिशय निंदनीय व सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे अशी भावना खासदार उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केली आहे. पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात एकतर्फी प्रेमातून कबड्डीपट्टू तरुणीचा खून झाला. तिच्या मारेक-यांना पाेलिसांनी अटक केली आहे. या घटनेचे निंदा पुण्यासह राज्यभरातून उमटू लागली आहे. udayanraje-bhosale-on-pune-kabaddi-player-14-year-old-girl-incident-sml80

udayanraje bhosale
Rally of Himalayas : तनिका शानभागची चमकदार कामगिरी

या घटनेचा खासदार उदयनराजे भाेसले यांनी तीव्र निषेध नाेंदविला आहे. उदयनराजेंनी समाज माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते लिहितात पुण्याच्या बिबवेवाडी परिसरात अल्पवयीन विद्यार्थिनी कबड्डी खेळत असताना तिच्यावर कोयत्यानं वार करुन हत्या झाल्याची घटना मन हेलावून टाकणारी व माणूसकीला काळीमा फासणारी आहे.

शाळेत शिकणाऱ्या, कबड्डीपटू होण्याची स्वप्न पाहणाऱ्या छोट्या मुलीच्या हत्येनं सर्वांची मान शरमेनं खाली गेली आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात अल्पवयीन मुलीची मैदानात खेळताना अशी निर्घृण हत्या होणं हे अतिशय निंदनीय व सामाजिक अध:पतनाचं गंभीर लक्षण आहे. तिच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असेही उदयनराजेंनी udayanraje bhosale नमूद केले आहे.

Related Stories

No stories found.