किल्ले प्रतापगडवरुन उदयनराजेंचे बंधू शिवेंद्रराजेंना आव्हान

किल्ले प्रतापगडवरुन उदयनराजेंचे बंधू शिवेंद्रराजेंना आव्हान
udayanraje bhosale shivendraraje bhosale

किल्ले प्रतापगड (महाबळेश्वर) : खासदार उदयनराजे भाेसले यांनी आज (गुरुवार) किल्ले प्रतापगडावर भवानी मातेची पूजा केली. त्यांनतर पत्रकारांशी संवाद साधताना उदयनराजेंनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी मारलेल्या टाेल्यावर पलटवार केला. खासदार उदयनराजे यांनी दुचाकीवरून मारलेल्या फेरफटक्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी जोरदार टीका केली होती. udayanraje-bhosale-shivendraraje-pratapgad-navratri-satara-political-news-sml80

udayanraje bhosale shivendraraje bhosale
उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा

या टीकेस प्रतिउत्तर देताना खासदार उदयनराजे म्हणाले मला चारचाकी वरून फिरणं परवडत नाही. मी चालत फिरीन, रांगत फिरीन, लोळत फिरीन तुम्हांला याबद्दल दुःख वाटत असेल तर तुम्ही पण तसे करा असेही म्हटलं.

उदयनराजेंनी किल्ले प्रतापगडावरुनच आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांचे नाव न घेता हिम्मत असेल तर समोरा समोर या असे आव्हान देखील दिले. दरम्यान सातारा पालिकेची निवडणुकीची तारीख जाहीर हाेण्यापुर्वीच दाेन्ही राजेंच्या udayanraje bhosale shivendraraje bhosale आघाड्यातील इच्छुकांनी आपआपल्या पेठांमध्ये निवडणुकीसाठीची तयारी सुरु केल्याचे चित्र सध्या सातारा शहरात आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.