शिवेंद्रराजे Hearty Congrats! अखेर उदयनराजेंनी गाठले 'सुरुची'

शिवेंद्रराजे Hearty Congrats! अखेर उदयनराजेंनी गाठले 'सुरुची'
Udayanraje Bhosale Shivendraraje Bhosale

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत बिनविराेध निवड झालेले दाेन्ही राजेंनी आज (बुधवार) एकमेकांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. उदयनराजेंनी शासकीय विश्रामगृह येथे माध्यमांशी संवाद साधल्यानंतर थेट आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांचा सुरुची बंगला गाठला. तेथे त्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांचे अभिनंदन केले. आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी देखील उदयनराजेंचे अभिनंदन केले. udayanraje Bhosale Shivendraraje Bhosale Satara Dcc bank election 2021

Udayanraje Bhosale Shivendraraje Bhosale
मराठा आरक्षण रद्दचा निर्णय समाजासाठी दुर्दैवी - शिवेंद्रसिंहराजे भोसले

त्यानंतर दाेन्ही नेत्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या कार्यालयात काही काळ गप्पा मारल्या. त्यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पत्नी वेदांतिकाराजे भाेसले, फिराेज पठाण, नगरसेवक बाळासाहेब ढेकणे आदी उपस्थित हाेते.

दरम्यान त्यापुर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे भाेसले यांनी बॅंकेच्या आणि सभासदांच्या हितासाठी मी माझी भुमिका मांडत राहिलाे. माझ्या भुमिकेस आणि केलेल्या विनंतीचा विचार करुन मला बिनविराेध निवडून दिलेल्या सर्वांची मी आभार मानताे. परंतु जे चुकीचे असेल त्यावर मी आवाज उठविणारच असे सांगितले. यावेळी शिवेंद्रसिंहराजे हे माझ्या शेजारीच राहतात त्यामुळे ते भेटले नाही तर त्यांना गाठणार असे उदयनराजेंनी माध्यमांच्या प्रश्नांवर उत्तर दिले.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com