'कार्यकर्त्यांचे विक पाँईट हेरून नाड्या आवळता'; उदयनराजेंचा शिवेंद्रसिंहराजेंवर गंभीर आरोप

'अहंकाराने सर्वनाश होता हे तुम्ही जाणिवपूर्वक विसरत आहात...'
Udayanraje Bhosale Vs Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale Vs Shivendraraje BhosaleSaam TV

सातारा : आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendraraje Bhosale) यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर प्रेस नोट काढून टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता उदयनराजे यांनी दिल्ली येथून एक प्रेस नोट जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'ज्यामध्ये जय, पराजय अपेक्षित असतो, त्यालाच निवडणुका (Election) म्हणतात. आमचा पराभव आम्ही खुल्या मनाने स्विकारला, तसेच ज्यावेळी जय झाला त्यावेळी हुरळुनही गेलो नाही.

आमच्या लोकसभेतील पराभवाची कारण तोंड वर करून विचारताय तर आधी तुमच्या विधानसभेतील पोटनिवडणुकीच्या पराभवाची कारणं द्या. ती जी कारण असतील तीच आमची समजा' असा सडेतोड पलटवार उदयनराजे (MP Chhatrapati Udayanraje Bhosale) यांनी केला आहे.

ते पुढे म्हणाले, बँक कायदेशीर मर्ज केली असे म्हणता, तर मर्ज करण्यासाठीच बॅन्क स्थापन केली होती का? एक बॅन्क तुमच्या अंदाधुंद भ्रष्ट कारभाराने बुडीत काढली पण त्याकरीता दुस-या बॅकेचाही गळा घोटला सहकारी बझारचे रेस्टॉरंट केले, पुढे रेस्टॉरंटही बंद पाडले हे प्रकार सहकारातील तत्वज्ञानात येत नाही. परंतु हाच तुमचा खरा वारसा आहे हे तुम्ही दाखवून दिले आहे अश्या खरमरीत शब्दात जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.

पाहा व्हिडीओ -

उदयनराजे यांनी नवी दिल्ली येथुन दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे म्हटलं आहे की, आमचा आणि तुमचा मार्ग वेगळा तर आहेच, तसेच अन्य काही बाबी आणि उदिष्ट देखिल वेगळी आहेत. आम्ही जनसामान्यांना आमचे समजतो, जनतेला जनार्दन समजतो. आम्ही निस्वार्थी मनाने कार्यरत राहतो, तुमचं तसं नाही, तुम्ही स्वार्थापोटी जनसामान्यांना जवळ करता, जनतेचे किंवा कार्यकर्त्यांचे विक पाँईट हेरून त्यांच्या नाड्या आवळता जनतेमुळे आम्ही आहोत ही भावना आमची तर जनता आमच्यमुळे आहे. अशी भावना तुमची सहकारी संस्था सभासदांच्या मालकीच्या आणि उध्दारासाठी आहेत ही आमची धारणा, तर सहकार म्हणजे स्वतःची खाजगी मालमत्ता ही तुमची धारणा.

असा जो काही फरक आहे तो मुलभूत फरक आहे. त्यामुळे दोषांमधील विचारांची उंची व खोली सुध्दा वेगळी आहे. दुसऱ्याच्या पराभवाची कारणे विचारणारे तुम्ही स्वतःला अहंकारी आणि अहंमन्य देखील समजता आहात. अहंकाराने सर्वनाश होता हे तुम्ही जाणिवपूर्वक विसरत आहात असंही उदयनराजे म्हणाले आहेत. तुमचे ते काम आणि आमचा तो स्टंट असा शोध तुम्ही लावलेला आहे ती तुमची वैचारिक दिवाळखोरी आहे.

Udayanraje Bhosale Vs Shivendraraje Bhosale
उदयनराजेंच्या भ्रष्ट कारभाराचा हिशोब सातारकरच करतील, शिवेंद्रसिंहराजेंचा पलटवार

आम्ही ज्यावेळी एकादा प्रकल्प अंतिम टप्यात येतो त्यावेळी त्याची निधीच्या आकडेवारीसह आणि तांत्रिक बाबींसह आम्ही माहीती देत असतो. तुमच्या सारखे आता प्रस्ताव मुख्याधिकारी यांना दिला. लगेच त्याचा फोटो आणि बातमी आता तो प्रस्ताव जिल्हाधिकारी यांचेकडे आला, त्याचा फोटा आणि बातमी, आता तो प्रस्ताव विभागीय आयुक्ताकडे गेला, त्याचा फोटो आणि बातमी आता तो प्रस्ताव सचिवांकडे गेला त्याची बातमी आणि त्याचा तुमचा फोटो, आता तो प्रस्ताव जर दादांकडे असेल तर त्याची बातमी आणि यांचा फोटो. परंतु अन्य महोदयांकडे असेल तर मात्र यांना तेथे कोणी विचारतच नाही.

त्यामुळे त्याची बातमी नाही आणि फोटोसुध्दा नाही. तुम्ही परफेक्शनिस्ट नव्हे तर फक्शनिष्ट आहात. असला प्रकार तुमचा तुम्हालाच शोभुत दिसतो. हा फरक सुध्दा एक आपल्या मार्गातील वेगळेपण दाखवणारा आहे असा टोला उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजेंना लगावला आहे.

सातारा-कराड (Satara-Karad) हे जंक्शन नाही त्यामुळे तेथून गाडी सुरु करता येत नाही याचे देखिल यांना भान नाही, उचलली जीभ लावली टाळयाला असा यांचा एकंदरीत नखरा आहे. प्लॅटफॉर्म शेड, लोहमार्गाचे दुहरीकरण, विद्युतीकरण प्रवाश्यांच्या सुविधांमधील सुधारणा अशी किती तरी काम केली आहेत. १०-१२ वर्षांपूर्वी फक्त २ गाड्यांची ये-जा सुरु होती. आज रोजी १९ गाड्यांची ये-जा सुरु आहे. म्हणजे पूर्वीच्या अप अँड डाऊन १८ गाड्यांच्या तुलनेत ३८ रेल्वेगाड्या आज सातारा-कराड मधुन धावतायत, एकदा डोळ्यात अंजन घालुन बघा म्हणजे दिसेल आणि समजेल, सातारा शहरात रस्त्यांची कामे वेळोवेळी झाली आहेत. आता पावसाळ्यात काही ठिकाणी खड्डे पडले आहेत त्याचे पॅचिंगचे काम प्रशासनाने हाती घ्यावे अशी सूचना एक लोकप्रतिनिधी म्हणून केली आहे.

Udayanraje Bhosale Vs Shivendraraje Bhosale
Shivsena : ज्येष्ठ शिवसैनिकांच्या भेटीगाठी सुरुच; मुख्यमंत्र्यांनी घेतली मनोहर जोशींची भेट

आमच्या घरासमोरील रस्ता झाला कि नाही झाला तरी सामान्य सातारकरांच्या गल्लीबोळातील रस्ते झाले पाहीजेत अशी आमची प्रशासनाला विनंती आहे. विकासपुरुष कदाचित तुम्हीच आहात. कारण विकासरत्नांचा वारसा लाभलेला आहे. आम्ही या मातीचे ऋण मानणारे आणि समाजामुळे आमचे स्थान आहे ही ठाम धारणा असणारे सर्वसामान्य जनतेच आहोत. नगरपालिकेविषयी बिनबुडाचे आरोप करणे निरर्थक आहे. सातारकरांनी आमच्याकडे सत्ता सोपवली म्हणून आरोप होणार हे अपेक्षित आहे. निवडणुकीमध्ये नगरपरिषदेच्या कारभाराबाबत जनता जनार्दन जो कौल देईल तो आम्हाला मान्य असेल तथापि त्यांच्या आरोपांना आम्ही किंवा सातारकर कधीच भीक घालणार नाहीत असंही उदयनराजे म्हणाले आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com