Uddhav Thackeray on BJP: भाजपसोबत पुन्हा जाणार का? उद्धव ठाकरेंनी स्षष्टच सांगितलं

Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत पुन्हा जाणार का, यावर भाष्य केलं आहे.
Uddhav Thackeray on BJP
Uddhav Thackeray on BJPsaam tv

निवृत्ती बाबर

Uddhav thackeray News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत पुन्हा जाणार का, यावर भाष्य केलं आहे. 'मी पुन्हा भाजपसोबत जाणार की नाही हे विसरा, पण त्यांनी मला यामध्ये का ढकललं ? हे त्यांना विचारा, असं उत्तर भाजपसोबत पुन्हा जाणार का, या प्रश्नाला ठाकरे यांनी दिलं. (Latest Marathi News)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत देशातील विविध राजकीय घडमोडींवर भाष्य केलं.

भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'भाजप पक्ष संधीसाधू आणि हुकूमशाही पक्ष आहे. जिथे भाजपच्या विरोधात प्रबळ विरोधी पक्ष आहे. तिथे लोक भाजपाच्या विरोधात यापुढे मतदान करतील. आगामी काळात भाजप जातीय ध्रुवीकरणाचा अवलंब करू शकेल'.

Uddhav Thackeray on BJP
Sameer Wankhede News : समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीवर महाराष्ट्रातील बड्या नेत्याला वेगळाच संशय, म्हणाले...

शिंदे गटावर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या 16 आमदारांना हे अपात्र करावंच लागेल आणि तशा प्रकारचा निर्णय येईल. निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह आणि नावाबद्दलचा निर्णय चुकीच्या पद्धतीने दिलं'.

'निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही वीस लाख सदस्य नोंदणीचे कागदपत्र जमा केले. आमचा पाठिंबा त्यांच्यासमोर दाखवला तरी सुद्धा निर्णय हा त्यांच्या बाजूने गेला हे चुकीचं आहे आणि भविष्यात सुद्धा हे होऊ नये, असे ठाकरे म्हणाले.

'निवडणूक आयोग पक्षाची नोंदणी करू शकते आणि निवडणूक चिन्ह वाटप करू शकते, परंतु ते कोणाच्याही पक्षाचे नाव ठरवू शकत नाही, असेही ठाकरे पुढे म्हणाले.

'शिवसेना माझ्या पक्षाचे नाव इतरांना देऊ शकत नाहीत. त्यांना विचारल्यावर आम्ही नाव [शिवसेना] दिले नाही. माझ्या वडिलांनी ते नाव दिले. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा होता, असे ते म्हणाले.

आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, 'लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा जिथे भाजपच्या विरोधात प्रबळ विरोधी पक्ष असेल. तिथे लोक भाजपाच्या विरोधात मतदान करतील . मग तिथे प्रादेशिक पत्र मजूबत स्थितीत असेल. त्याला मत देतील किंवा मग काँग्रेसला मतदान करतील. ज्या ठिकाणी भाजपपेक्षा प्रभावी वेगळा पर्याय असेल तो पर्याय मतदार निवडतील'.

Uddhav Thackeray on BJP
Sanjay Raut News Today: २०२४ मध्ये ED कार्यालयात कोणाला पाठवायचं याच्या याद्या तयार करू; संजय राऊतांच्या विधानानं खळबळ

'मला काँग्रेससोबत जायची गरज नव्हती, पण भाजपने मला यामध्ये ढकललं. कारण 'भाजपची वापरा आणि फेकून द्या' पॉलिसी आहे . मी पुन्हा भाजपसोबत जाणार की नाही हे विसरा, पण त्यांनी मला यामध्ये का ढकललं ? हे त्यांना विचारा', असे उत्तर भाजपसोबत जाण्याच्या प्रश्नावर ठाकरेंनी दिले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com