Uddhav Thackeray News : मालेगावात उद्धव ठाकरेंचे उर्दू भाषेत पोस्टर; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Uddhav Thackeray latest news : उद्धव ठाकरे यांची खेडनंतर आता मालेगावात जंगी सभा होणार आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSaam tv

Nashik News : शिवसेनेत फुट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. आहे. पक्षातील आमदार-खासदार शिंदे गटात सामील झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्ष बांधणीसाठी सुरूवात केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षाला उभारी मिळण्यासाठी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. उद्धव ठाकरे यांची खेडनंतर आता मालेगावात मोठी सभा होणार आहे. या मालेगावातील सभेआधीच उद्धव ठाकरे यांच्या उर्दू भाषेतील बॅनरची चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांची खेडमध्ये तुफान सभा झाली. खेडच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. खेडच्या सभेनंतर आता मालेगावात ठाकरेंची सभा होणार आहे. या मालेगावातील (Malegaon) सभा होण्याआधीच ठाकरे यांच्या उर्दू भाषेतील बॅनरची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Uddhav Thackeray News
CM Eknath Shinde : राहुल गांधींनी एकदा तरी त्या सेल्यूलर जेलमध्ये राहून यावं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका

उद्धव ठाकरे यांच्या या पोस्टरवर प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे , आदित्य ठाकरे, संजय राऊत, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो आहेत. तर या पोस्टरवील मजकूर हा उर्दू भाषेत आहे. तसेच पोस्टरमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासहित स्थानिक पदाधिकाऱ्यांचेही फोटो आहेत.

दरम्यान, एकीकडे राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याकडून उर्दू भाषेतील पोस्टरमधून मुस्लिम बांधवांना सभेसाठी येण्यासाठी आवाहन केलं जातं आहे.

Uddhav Thackeray News
Pune Crime News: पुण्यात चालकाची मुजोरी; वाहतूक पोलिसाला 50 मीटरपर्यंत फरफटत नेले, परिसरात खळबळ

उद्धव ठाकरे यांच्या उर्दू पोस्टरवरून शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी जोरदार टीका केली आहे. 'ह्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य घडवल होतं.. नक्की महाराष्ट्राच्या याच मातीत जन्मलात ना तुम्ही? हीच का तुमची हिंदुत्वादी विचारधारा?, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com