shambhuraj desai & chandrakant patil
shambhuraj desai & chandrakant patil

दादांची मुख्यमंत्र्यांवर टीका, शंभूराज भडकले; आम्ही समाचार घेऊ

पाटण मतदारसंघात हाेत असलेल्या निवडणुका सेनेच्या चिन्हावरच लढविल्या जात आहेत असेही मंत्री देसाईंनी स्पष्ट केले.

सातारा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर फलटण (satara) येथे झालेल्या कार्यक्रमात टिका केली होती. देशाच्या राजकारणात जायचं असेल तर घराच्या बाहेर पडावं लागतं असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं हाेते. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई (shambhuraj desai) यांनी दादांच्या त्या वक्तव्यावर शिवसेना गावा गावांत त्याचा समाजार घेईल असे नमूद करीत आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर सातारा येथे टीका केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या या आरोपांना कोणताही आधार नाही. चंद्रकांत पाटील हे सगळं त्यांना आलेल्या नैराश्यातुन बोलुन वेगवेगळ्या वल्गना करताहेत. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी चंद्रकांत पाटील यांच्या अशा पद्धतीच्या वक्तव्याने शिवसेना गप्प बसणार नसून त्या वक्तव्याचा गावा गावांत समाचार घेईल असा इशारा दिला.

shambhuraj desai & chandrakant patil
काेराेनाने मृत झालेल्या वारसांना ५० हजारांची मदत; इथं करा अर्ज

दरम्यान सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत (dcc bank) स्विकृत संचालक म्हणून जायची इच्छा नसल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. तसेच पाटण मतदारसंघात हाेत असलेल्या निवडणुका या सेनेच्या चिन्हावरच लढविल्या जात आहेत असेही स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com