Sharad Pawar : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा? शरद पवारांनी दिली मोठी प्रतिक्रिया

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत स्पष्ट मत मांडलं आहे.
Sharad Pawar On Shivsena Dasara Melava
Sharad Pawar On Shivsena Dasara MelavaSaam Tv

Sharad Pawar On Shivsena Dasara Melava : एकीकडे शिवसेना (Shivsena) नेमकी कुणाची हा सत्तासंघर्षाचा वाद सुप्रीम कोर्टात पोहचला असताना, दुसरीकडे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून (Dasara Melava) राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यापासून एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं पाहायला मिळतंय. आता या वादावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. (Sharad Pawar News Today)

Sharad Pawar On Shivsena Dasara Melava
Raj Thackeray Speech : मनसे-भाजप युती होणार? राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा?

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पंढरपुरात पत्रकारपरिषद घेतली. यावेळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दसरा मेळावा घेणाचा अधिकार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेनं त्यांना बीकेसीचं मैदान दिलं आहे. मात्र, शिवाजी पार्क म्हटलं की शिवसेनाच... असं स्पष्ट मत पवारांनी मांडलं आहे.

दरवर्षी शिवाजी पार्कवर शिवसेनेकडून दसरा मेळावा घेण्यात येतो. यावर्षी शिवसेनेत गट पडल्याने दसरा मेळाव्याबाबत मोठा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचीच मागणी करण्यात आली होती. मात्र अद्यापही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Sharad Pawar On Shivsena Dasara Melava
राज्यात आलेले उद्योग बाहेर कसे जातात? फॉक्सकॉन प्रकल्पावर राज ठाकरेंचा सवाल

याबाबत शरद पवारांनी आपलं रोखठोक मत मांडलं आहे. 'एकनाथ शिंदेंनाही दसरा मेळावा घेण्याचा अधिकार आहे. त्यासाठी त्यांना बीकेसीचं मैदान देण्यात आलं आहे. मात्र शिवाजी पार्क म्हटलं की शिवसेनाच असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, शरद पवार यांनी मांडलेल्या स्पष्ट मतानंतर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेच दसरा मेळावा घेतील का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाचा संघर्ष पेटणार?

दसरा मेळाव्याबाबत सध्या महापालिकेकडे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटाचे अर्ज शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्या संदर्भात आले आहेत. पहिला अर्ज शिवसेनेचा आला आहे त्यामुळे शिवसेनेलाच दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेनेला आहे. पण मुंबई महापालिका हे प्रकरण ताणून निर्णय घेण्यास उशीर लावत असेल तर दसऱ्याच्या दिवशी थेट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com