'शिवसेना जात-पात मानत नाही'; सेनेचा औरंगाबादच्या सभेचा दुसरा टीझर प्रसिद्ध

शिवसेनेच्या (Shivsena) मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत.
Uddhav thackray
Uddhav thackray Saam Tv

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात ८ जून रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्या सभेला पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. मात्र, या सभेसाठी पोलिसांनी १६ अटी घातल्या आहेत.आता शिवसेनेच्या (Shivsena) मराठवाड्यातील पहिल्या शाखेच्या ३७ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेसाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत. दरम्यान, शिवसेनेने औरंगाबादच्या (Aurangabad) सभेचा दुसरा टीझर प्रसिद्ध केला आहे. ( Maharashtra politics Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी मुंबईतील जाहीर सभेत भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर होणाऱ्या औरंगाबादच्या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या लक्षवेधी सभेचा दुसरा टीझर शिवसेनेना प्रसिद्ध केला आहे. 'शिवसेना जात-पात मानत नाही. शिवसेनेचा हा भगवा झेंडा डौलाने, जबरदस्त तेजाने फडकत राहिले पाहिजे, पाहिजे.. पाहिजे...' या शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या भाषणातील वक्तव्यांचा वापर या टीझरमध्ये केला आहे. त्यामुळे शिवसेनेना या सभेसाठी जय्यत तयारी केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिवसेनेना पहिला टीझर प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये 'औरंगाबाद नाही, संभाजीनगर, मी नाव दिलंय, शिवसेनेनं नाव दिलंय.' अशी शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील वक्तव्याचा वापर या टीझरमध्ये करण्यात आला होता. त्यानंतर या टीझरची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. दरम्यान, औरंगाबादच्या सभेत औरंगाबाद शहर नामकरण, भाजपवर काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Uddhav thackray
औरंगाबादमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेला पोलिसांची परवानगी; मात्र घातल्या 'या' १६ अटी

दरम्यान, मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये ८ जून १९८५ रोजी स्थापन झाली. त्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी संपूर्ण मराठवाड्यातील शिवसैनिक उपस्थित राहणार असल्याचं शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

Edited By - Vishal Gangurde

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com