मुंबईतील 'त्या' शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची थाप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दादर, माहीम आणि वडळा विभागातील सर्व शिवसैनिकांची आणि पदाधिकार्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसैनिकाची पाठ थोपटली आहे.
मुंबईतील 'त्या' शिवसैनिकांच्या पाठीवर उद्धव ठाकरेंची थाप
उद्धव ठाकरेवैदेही काणेकर

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज दादर, माहीम आणि वडळा विभागातील सर्व शिवसैनिकांची आणि पदाधिकार्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसैनिकाची पाठ थोपटली आहे. शिवसेनेने या भेटीचे फोटो ट्विट केले असून, शिवसैनिक आणि शिवसेना पक्ष प्रमुख एव्हढाच उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आला आहे. काल शिवसेना भवनासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी चोप दिल्यानंतर आज झालेली ही भेट वेगळेच संकेत देता आहे.

या भेटीने एकप्रकारे उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी केलेल्या कृत्याचे समर्थन केल्याचं दिसून येतं आहे. ''कुणी अंगावर आले की शिंगावर घ्या" या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणी प्रमाणे शिवसैनिकांनी कृती केल्याने उद्धव ठाकरे यांनीही शिवसैनिकांच्या पाठीवर शाबाशकीची थाप मारली आहे. (Uddhav Thackeray's pat on the back of those Shiv Sainiks in Mumbai)

दरम्यान, मुंबई Mumbai मध्ये भाजपच्या BJP युवा मोर्चाने शिवसेने ShivSena विरोधात शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. अयोध्येमधील श्री राम मंदिर Shri Ram Temple बांधण्यासाठी भूसंपादनाविषयी खोटे आरोप केल्याच दावा करत भाजप फटकार मोर्चा आयोजित केल होता. भाजप युवा मोर्चाचे मुंबईचे अध्यक्ष तेजिंदरसिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, शिवसेना आमदार सदा सरवणकर हे शिवसैनिकांबरोबर सेनाभवन परिसरात दाखल झाले, परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी या परिसरात मोठा फौजफाटा तैनात केला होता.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com