प्रसंगी कटू निर्णय घेऊ; सरकारवर तुमचा विश्वास आहे ना? मुख्यमंत्री

uddhav thackreay
uddhav thackreay

सांगली : मी अंदाज घेत आहे किती नुकसान झालेले आहे आणि किती मदत द्यावी लागेल. एक लक्षात घ्या. काही ठिकाणी कायमस्वरुपी ताेडगा काढावा लागेल. तुमची सर्वांची तयारी आहे का असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना केला. काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागतील. काेणालाही वार-यावर साेडणार नाही. पुर्नवसन करीन त्यासाठी सर्व गाेष्टींची तयारी ठेवा अन्यथा पाण्याच्या पातळ्या माेजण्यासाठी आपलं आयुष्य नाही. सरकार म्हणून जे जे तुमच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील ते ते आम्ही घेणार आहाेत. (uddhav-thackreay-sangli-bhilwadi-flood-affected-area-sml80)

जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray हे आज (साेमवार) सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. भिलवडी येथील बाजारपेठेत मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्त आणि ग्रामस्थांशी संवाद पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांची काळजी घेणार, नुकसानीचा संपूर्ण आढावा घेणार असे नमूद केले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले काेराेनाचे संकट आणि त्यानंतर काेसळलेली ही दूसरी आपत्ती आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. काही कुटुंबातील व्यक्ती साेडून गेलेत. तुमच्या व्यथा आणि वेदना आमच्यापर्यंत पाेहचल्या आहेत. ज्या वेळेला हे संकट काेसळणार त्याच वेळेला आपले प्रशासन कामाला लागले. धाेकादायक ठिकाणच्या लाेकांना स्थलांतरित केले. या संपुर्ण पट्ट्यात काही लाख लाेकांना आपण सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. प्राधान्यक्रम जिवीतहानी हाेऊ नाही याची आपण काळजी घेतली. तुम्हांला घर साेडून जावे लागले. खरं तर ही आनंदाची बाब नाही असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

uddhav thackreay
पंचनाम्याला येणारे अधिकारी विचारताहेत घरात पाणी आले हाेते का?

ते म्हणाले घरांचे, शेतीचे नुकसान झाले आहे. मी काेकण आणि पश्चिम महामहाराष्ट्रातील पूरग्रस्त, दुर्घटनाग्रस्त भागांना भेटी देत आहे. संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशिल आहाेत. तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच हा आत्मविश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मी अंदाज घेत आहे किती नुकसान झालेले आहे आणि किती मदत द्यावी लागेल. एक लक्षात घ्या. काही ठिकाणी कायमस्वरुपी ताेडगा काढावा लागेल. तुमची सर्वांची तयारी आहे का असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना केला. काही ठिकाणी कटू निर्णय घ्यावे लागतील. काेणालाही वार-यावर साेडणार नाही. पुर्नवसन करीन त्यासाठी सर्व गाेष्टींची तयारी ठेवा अन्यथा पाण्याच्या पातळ्या माेजण्यासाठी आपलं आयुष्य नाही. सरकार म्हणून जे जे तुमच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील ते ते आम्ही घेणार आहाेत.

संकट आल्यानंतर प्रथा परंपरेप्रमाणे पॅकेज जाहीर केले जाते. मी आत्ताच काेणतेही पॅकेज जाहीर करणार नाही. कैक हजार काेटींची पॅकेज जाहीर हाेतात ते काेठे जाते कुणालाच माहित नाही. मला असलं थाेतांड येत नाही. मी खाेट बाेलत नाही. मी प्रामाणिकपणे करणार, माझ्या साेबत सर्व मंत्रिमंडळ आहे. सरकारवर विश्वास ठेवा जे काही करता येणे शक्य आहे ते आम्ही करु.

यावेळी राज्यमंत्री विश्वजीत कदम, ज्येष्ठ नेते माेहनराव कदम याबराेबरच विविध गावाचे सरपंच, उपसरंपच, सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित हाेते. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंकलखाेप गावास रवाना झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com