मुख्यमंत्र्यांची सकारात्मकता; विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती खूष

Uddhav Thackeray Pandharpur
Uddhav Thackeray Pandharpur

पंढरपूर : आषाढी यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर आराखड्याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी निवेदन देऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिराच्या आराखड्यासाठी लागणाऱ्या खर्चाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. (uddhav-thackreay-vitthal-rukmini-mandir-pandharpur-trending-news-sml80)

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे पुरातन आहे. या मंदिराला मूळ स्वरूप देण्यासाठी मंदिर समिती व पुरातत्व विभागाने एक आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार काम करण्यासाठी जवळपास 55 ते 60 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

यासंदर्भात आज मंदिर समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा प्रस्ताव दिला. या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवल्याने नजीकच्या काळात विठ्ठल मंदिराच्या Uddhav Thackeray Pandharpur आराखड्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

पंढरपूरचे अर्थकारण ठप्प

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीही पंढरपूरची आषाढी यात्रा साध्या पद्धतीने साजरी केली जात आहे. दरम्यान पंढरपूर शहरात 25 जुलैपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. याचा फटका थेट मंदिर परिसरातील व शहरातील व्यापाऱ्यांना बसला आहे.

आषाढी यात्रा रद्द करण्यात आल्यामुळे मंदिर परिसरातील पेढा, बत्तासे, हार-फुले, उदबत्ती भांडी, मुर्त्या, फोटो फ्रेम असे अनेक छोटे-मोठे व्यवसायिक नुकसानीत आले आहेत. आषाढी यात्रेदरम्यान पंढरपूर शहरांमध्ये कोट्यावधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. परंतु यात्रा रद्द झाल्यामुळे येथील व्यापाऱ्यांना त्याचा थेट आर्थिक फटका बसला आहे.

Uddhav Thackeray Pandharpur
वीजबिले भरुन ग्रामपंचायतींना आर्थिक बळकट करा : उदयनराजे

मानाच्या वारकऱ्यांकडून नगरप्रदक्षिणा पूर्ण

पंढरपूरामध्ये वर्षानुवर्षे चालतं येणारी नागरप्रदिक्षणेची परंपरा यंदा ही मानाच्या वारकऱ्यांकडून अबादित राखण्यात आली आहे. ज्या वारकऱ्यांना विठुरायाचे थेट दर्शन मिळतं नाही असे वारकरी चंद्रभागेचे स्नान घेऊन कळसाला वंदन करून नागरप्रदिक्षिणा घालते आणि त्यानंतरच वारी पूर्णत्वास जाते अशी वर्षानुवर्षांची परंपरा आहे. कोरोनाच्या सावटामध्ये सुद्धा मानाच्या वारकऱ्यांकडून ही परंपरा कायम ठेवण्यात आलेली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com