Udhav Thackeray: सभेची जय्यत तयारी! गोळीबार मैदानात ठाकरी तोफ धडाडणार; टीझरही प्रदर्शित

उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये 300 पोलीस, 50 होमगार्ड असा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संपूर्ण राज्याचे या सभेकडे लक्ष लागून राहिले आहे..
Udhav Thackeray
Udhav ThackeraySaamtv

जितेश कोळी...

Khed Ratnagiri: शिवसेना पक्ष (Shivsena) आणि चिन्हाचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंची आज कोकणात पहिलीच जाहीर सभा होत आहे. या सभेसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीतील खेडमध्ये दाखल झाले आहेत. आज संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची खेडच्या गोळीबार मैदानावर सभा होणार आहे. त्यामुळे ठाकरे आज कोणावर निशाणा साधणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मंत्री रामदास कदम यांचं कोकणात वर्चस्व आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे या नेत्यांचा कसा समाचार घेतात आणि या नेत्यांबाबत कोणते गौप्यस्फोट करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर खेडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Udhav Thackeray
Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

उद्धव ठाकरे (Udhav thackeray) यांची गोळीबार मैदानावर आज संध्याकाळी सभा होणार आहे. या सभेला सुमारे 30 हजार लोक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सभेभोवती पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 26 पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. त्यात 4 डीवायएसपी आणि 25 अतिरिक्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच 300 पोलीस, 50 होमगार्ड आणि बॉम्ब स्कॉड पथकाचाही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय रेल्वे स्थानक, एसटी स्थानकावरही पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे.

Udhav Thackeray
बड्डे आहे लेकाचा... मुलाच्या वाढदिवशी चक्क 'कार' कापली! वसईतील सोहळ्याची राज्यभर चर्चा

तत्पुर्वी, या सभेचा शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे या अधिकृत ट्विटर हॅण्डलरवरून एक टीजर प्रसारित करण्यात आला आहे. ज्यामध्ये उद्धव ठाकरे यांचे भाषणातील काही काही डायलॉग ऐकायला मिळतोय. ‘आता जिंकेपर्यंत लढायचं’ अशा कॅप्शनखाली हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

निष्ठा मातोश्रीशी,इमान भगव्याशी’ या आशयाखाली शिवसैनिकांना या सभेसाठी साद घालण्यात आली आहे. मला माझे सैनिक अन्यायावर वार करणारे पाहिजे पाठीत वार करणारे नको असंही ठाकरे यामध्ये बोलताना ऐकायला मिळतंय. तसेच तुम्ही मला वज्रमूठ द्या.. दात पाडायचं काम मी करतो असं आवाहन देखील या टीजरद्वारे शिवसैनिकांना करण्यात आलं आहे. त्यामुळे ठाकरेंची ही सभा चांगलीच गाजणार असल्याचे दिसत आहे. या सभेतून ठाकरी तोफ कोणावर धडाडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.. (Maharashtra Politics)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com