उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात केवळ एकच बॅनर; राजकीय चर्चांना उधाण

ठाण्यातील तलाव पाळी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक बॅनर लावण्यात आला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) बालेकिल्ल्यात पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त केवळ एकच बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Uddhav thackeray news
Uddhav thackeray news saam tv

ठाणे : शिवसेनेचे पक्षप्रमुख, राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा २७ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाल्यानंतर ठाण्यात सेनेचे खासदार राजन विचारे यांच्याकडून आज ठाण्यातील तलाव पाळी या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक बॅनर लावण्यात आला आहे. शिवसेनेच्या (Shivsena) बालेकिल्ल्यात पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त केवळ एकच बॅनर लागल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ( Uddhav Thackeray News In Marathi )

Uddhav thackeray news
'मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका'; चंद्रकांत खैरेंचे राज ठाकरेंना भावनिक आवाहन

एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर राज्यासहित ठाण्याचं राजकारण देखील बदललं आहे. बंडखोरी आधी ठाण्यात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेकडो बॅनर लावले जायचे. परंतु शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंसाठी ठाण्यात केवळ एकच बॅनर लावण्यात आला आहे. खासदार राजन विचारे यांनी ठाण्याच्या जांभळी नाक्यावर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्यात आला आहे.

या बॅनरवर 'हिंदुत्वाचा तेजोमय वारसा' असा आशय आहे. तसेच बॅनरवर बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, मीनाताई ठाकरे यांच्यासहित उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे फोटो आहेत. बॅनरमार्फत खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राजन विचारे यांच्या बॅनरनंतर इतर ठिकाणी उद्धव ठाकरेंसाठी बॅनर लागतील का, अशी चर्चा ठाण्यात सुरू झाली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात केवळ ठाकरेंसाठी एकच बॅनर लागल्याने ठाणेकरांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

Uddhav thackeray news
विधानपरिषद निवडणुकीत २१ कोटी रुपयांत एका पक्षाची तीन मतं फोडली, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट

दरम्यान, ठाणे शिवसेनेचा बालेकिल्ला होता. आनंद दिघे यांनी संपूर्ण ठाण्यातील घराघरात शिवसेना पोहोचवली. त्यानंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्याची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी खांद्यावर घेतली. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर ठाण्यातील राजकीय समीकरण संपूर्ण बदललं आहे. ठाणे महापालिकेतील ६६ विद्यमान नगरसेवक हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यात ठाण्यात शिवसेनेसाठी खासदार विचारे हेच महत्वाचे शिलेदार राहिले आहेत. त्यामुळे शिवसेनेला आता ठाण्यात शुन्यातून संघटना उभारावी लागणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com