
Badlapur Marathi News: बदलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हास नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. सोमवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. क्षितिज शेजवळ (वय १७ वर्ष) आणि बाळकृष्ण (वय ३७ वर्ष) अशी मृत तरुणांची नावे आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (Breaking Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुण पोहण्यासाठी उल्हास नदीतपात्रात उतरले होते. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ते बुडू लागले. त्यामुळं त्यांना वाचवण्यासाठी एका इसमानं नदीत उडी मारली. (Latest Marathi News)
मात्र त्यालाही पाण्याचा अंदाज न आल्यानं तो सुद्धा बुडू लागला. यात आधी पोहायला गेलेल्या दोन तरुणांपैकी क्षितिज आणि त्याला वाचवायला गेलेला बाळकृष्ण या दोघांचाही बुडून मृत्यू झाला. तर दोघांना वाचवण्यासा नदीत उडी घेतलेल्या तरुणाने कसाबसा आपला जीव वाचवला.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बुडालेल्या दोघांचे मृतदेह अग्निशमन दलानं बाहेर काढले असून याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. एकाचवेळी दोन जीवलग मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
Edited by - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.