
अकोला : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे मामाने आपल्याच भाच्याची हत्या करून आत्महत्येचा बनाव केला होता. दरम्यान पोलिसानी आरोपीचा हा बनाव उघड करून त्याला अटक केली आहे. शेख अमीन शेख इकबाल असे आरोपी मामाचे नाव आहे. (Akola Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, 25 जुलै रोजी अकोला शहरातील अकोट फाईल परिसरात शेख अकबर शेख अफर या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ही घटना इंदिरानगर पोलीस ठाणे परिसरात घडली असल्याने अकोट फाईल पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी मृत तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता. ही आत्महत्या नसून हत्या असावी असा संशय पोलिसांना होता. याप्रकरणी पोलिसांनी मृत शेख अकबर याचा मामा शेख अमीन शेख इकबाल याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
पोलीस चौकशीदरम्यान, आरोपीने पोलिसांना सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यानंतर खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखा बोलू लागला. शेख अकबर याची आपणच रूमालाने गळा आवळून हत्या केली असल्याची कबुली आरोपी शेख अमीन यांनी पोलिसांना दिली.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी शेख अमीन, शेख इकबाल हा शेख अकबर, शेख अफसर याचा मामा आहे. दोघेही शेजारी राहतात. शेख अकबर हा व्यसनाधीन असल्याने, दररोज तो घरात धुडगूस घालायचा. कुटुंबीयांना वेठीस धरायचा. त्याच्या दररोजच्या त्रासाला कंटाळूनच मामाने त्याचा काटा काढला.
Edited By - Satish Daud
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.