बसस्थानकात कपडे काढून धिंगाना! प्रकार कॅमेरात कैद

सांगलीच्या विटा बसस्थानक परिसरात एक अजबच घटना घडली आहे. एकाने चक्क आपल्या अंगावरील कपडे काढून बसस्थानकात धिंगाना घातला आहे.
बसस्थानकात कपडे काढून धिंगाना! प्रकार कॅमेरात कैद
बसस्थानकात कपडे काढून धिंगाना! प्रकार कॅमेरात कैदविजय पाटील

विजय पाटील

सांगली : सांगलीच्या Sangali विटा बसस्थानक परिसरात एक अजबच घटना घडली आहे. एकाने चक्क आपल्या अंगावरील कपडे काढून बसस्थानकात धिंगाना घातला आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार कॅमेरात Camera कैद झाला आहे. या अचानक घडलेल्या प्रकाराने माञ महिलावर्गासह प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली होती.

विटा बसस्थानकात गुरुवारी सायंकाळी एक व्यक्ती चक्क आपल्या अंगावर केवळ अंतवस्ञच परिधान करुन बसस्थानकात आला. अंगावर कोणतेही कपडे नसलेली हीच व्यक्ती थेट प्रवाशांसाठी असणाऱ्या फलाटावरुन चालत जावून तेथे पहारा देणाऱ्याच टेबलवर जावून ती एवढ्यावरच न थांबता प्रवाशांना हातवारे करत इशारेही करु लागली. या अचानकच घडलेल्या प्रकाराने बसस्थानकातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना माञ या सर्व प्रकाराने शर्मेने मान खाली घालावी लागली. 

सध्या कोरोनामुळे Corona बसस्थानकात गर्दी जरी कमी असली तरी विटा बसस्थानकात असेच काहीतरी वेगळे प्रकार घडत आहेत. सध्या लाॅकडाऊनमध्ये कुठ बाहेर पडता येत नसले तरी बसस्थानकात येवून टाईमपास करणारेही इथे वाढले आहेत. याकडे पोलिस Police प्रशासनाचे मात्र सोयीस्कर दुर्लक्षच झाले आहे. इथे नेमण्यात आलेले पोलिस माञ इथे दिसत नाहीत. यापूर्वी बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अनेक चोरटे हात मारत होते. 

बसस्थानकात कपडे काढून धिंगाना! प्रकार कॅमेरात कैद
बांधकाम नियमित करा अन्यथा बांधकामावर हातोडा- आयुक्त मित्तल

विटा बसस्थानक हे सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे व प्रशस्त स्थानक आहे. परंतू इथे सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आहे. पर्वा तर चक्क एका व्यक्तीने कपडे काढून बसस्थानकात प्रवेश केल्याने येथील प्रवाशांचे माञ धाबे दणाणले आहेत. या सर्व प्रकारानंतर त्या कपडे काढलेल्या व्यक्तीला सुरक्षा रक्षकाने काठीचा धाक दाखवित बाहेर काढले.

Edited By-Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com