उमरखेडमध्ये अज्ञात युवकाचा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यावर गोळीबार!

वैद्यकीय अधिकारी रक्ताच्या थारोळ्यात ; आरोपी पसार
अज्ञात युवकाचा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यावर गोळीबार!
अज्ञात युवकाचा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यावर गोळीबार!SaamTvNews

-- संजय राठोड

यवतमाळ : श्री राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकिय उपजिल्हा रुग्णालयात सध्या कार्यरत असलेले बालरोग तज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे (वय ४५) हे पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेलच्या समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने येऊन त्यांच्यावर बेछूट गोळीबार (Firing) केला. या घटनेत तीन ते चार गोळ्या (Bullets) झाडल्याची धर्मकारे यांना लागल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे उमरखेड शासकीय रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे देखील पहा :

डॉ. हनुमंत धर्मकारे मागील ७ वर्षांपासून उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय त्यांचे उमरखेड (Umarkhed) बसस्थानकाच्या समोर खाजगी बाल रुग्णालय (Hospital) आहे. गेल्या ७ वर्षाच्या काळात त्यांची कारकीर्द ही अतिशय उत्तम राहिलेली आहे. या शिवाय कुठल्याही वादाच्या विषयात त्यांचे नाव चर्चेत आले नाही. असे असताना आज अचानक त्यांच्यावर अज्ञात तरुणाने गोळीबार केला. यामुळे शहरात चर्चेला पेव फुटले आहेत.

अज्ञात युवकाचा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यावर गोळीबार!
व्हेल माशाची उलटी तिघांना पडली भारी; तीन जण अटकेत, 5 कोटी 90 हजारांचा मुद्देमाल जप्त!

शहरातील उत्तरवार रुग्णालयाच्या नजीकच असलेल्या गोरखनाथ हॉटेल येथे चहा पाण्यासाठी डॉक्टरांची बैठक असते. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोटर सायकल वरून डॉ.धर्मकारे त्यांच्या खाजगी दवाखान्याकडे जात असताना अज्ञात युवकाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्या वेळी आजूबाजूच्या नागरिकांनी हा हल्लेखोरास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु दुचाकीवरील अज्ञात युवक त्याच्या भरधाव वेगाने पसार झाला. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या डॉक्टरांना नागरिकांनी उचलून येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार डॉ. धर्माकारे यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com