
Rajnath Singh In Chhatrapati Sambhajinagar today: केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते छत्रपती संभाजीनगरला भेट देणार आहे. आज सायंकाळी संभाजीनगरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप महासंमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. हे संम्मेलन अयोध्यानगरीतील आरटीओ कार्यालयाजवळ आयोजित करण्यात आले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे टीव्ही सेंटर चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. त्यानंतर वीर शिरोमणी महाराणा प्रताप महासंमेलन स्थळी पोहचतील. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय सोबतच काही वाहतुकीचे मार्गही बदलण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही संभाजीनगरात
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. ते देखील राजनाथ सिंह यांच्यासोबत सायंकाळी वीर शिरोमणी महाराणा प्रताप महासंमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी ते राजनाथ सिंह यांच्यासोबत शहरातील टीव्ही सेंटर येथी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास माल्यार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहतील. (Chhatrapati Sambhajinagar News)
हे नेतेही राहणार उपस्थित
संभाजीनगमध्ये होत असलेल्या या वीर शिरोमणी महाराणा प्रताप महासंमेलनाला राजनाथ सिंह याच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह राज्यातील वेगवेगळ्या विभागाचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.