प्रोटोकॉल बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी विमानात केले प्रवाशावर उपचार!

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेऊन विमानामध्ये एका प्रवाशावर उपचार केल्याचा फोटो सध्या व्हायरल होतोय.
प्रोटोकॉल बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी विमानात केले प्रवाशावर उपचार!
प्रोटोकॉल बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी विमानात केले प्रवाशावर उपचार!SaamTvNews

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेऊन विमानामध्ये एका प्रवाशावर उपचार केल्याचा फोटो सध्या व्हायरल होतोय. विमानामध्ये भागवत कराड यांच्यातला डॉक्टर पुन्हा जागा झाल्यानं मंत्री असावा तर असा, जो संकटकाळी मदतीला धावतो, अशी चर्चा सुरू झालीय. डॉ. भागवत कराड यांनी फेसबुकवर आपला अनुभव लिहिला आहे.

हे देखील पहा :

डॉ.भागवत कराड हे राजकारणात येण्यापूर्वी पूर्णवेळ डॉक्टर म्हणून कार्यरत होते. मराठवाड्यातील ते पहिले बालरोग शल्य चिकित्सक आहेत. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी ते सर्व परिचित आहेत. शिवाय त्यांनी आपल्या डॉक्टरकीच्या करिअरमध्ये अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून रुग्णांना बरे केले आहे. मात्र, गेल्या वीस वर्षांपासून ते वैद्यकीय सेवेपासून दूर होत पूर्णवेळ राजकारणात आले. नगरसेवक, महापौर आणि भारतीय जनता पार्टीच्या राज्य कार्यकारणीमध्ये ते कार्यरत होते. गेल्या वर्षी खासदार आणि काही महिन्यात केंद्रीय राज्य मंत्री झाले. नेहमी गरजूंना मदत करणे, मितभाषी हा त्यांचा स्थायीभाव आहे. त्यामुळे विमानतल्या एका फोटोने पुन्हा त्यांच्यातल्या माणुसकीची चर्चा केली जातेय.

प्रोटोकॉल बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी विमानात केले प्रवाशावर उपचार!
शेकडो स्त्रियांची यशस्वी प्रसूती करणाऱ्या परीचारिकेचा स्वतःच्या प्रसूती दरम्यान मृत्यू!
प्रोटोकॉल बाजूला ठेवून केंद्रीय मंत्री डॉ.भागवत कराड यांनी विमानात केले प्रवाशावर उपचार!
तुला मी पाहिजे का पैसे? प्रेयसीने पाजले उंदीर मारायचे औषध! प्रियकराने उसने दिले होते लाखो रुपये

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हे सोमवारी विमानाने दिल्लीहून मुंबईकडे निघाल्यानंतर एक प्रवासी चक्कर येऊन खाला पडला. त्यानंतर विमानात आरडाओरडा सुरू झाली. त्यावेळी डॉ. भागवत कराड हे स्वतः तिथं जाऊन पाहणी केली. एक व्यक्ती खाली पडल्याचे पाहिल्यानंतर त्यांच्यातल्या डॉक्टर जागा झाला. विमानात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय साधनाच्या आधारे त्यांनी त्या व्यक्तीवर उपचार केले. त्यानंतर त्या व्यक्तीला बरे वाटले.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com