केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लातूर दौऱ्यावर

2000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामाच्या उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लातूर दौऱ्यावर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लातूर दौऱ्यावरSaam Tv

लातूर - आज जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे 2000 कोटी रुपयांच्या विविध विकास कामाच्या उद्घाटन आणि लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. गडकरी यांच्या हस्ते या विकास कामाचे उद्घाटन आणि लोकार्पण संपन्न होत आहे. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख राज्यमंत्री संजय बनसोडे हे उपस्थित राहणार आहेत.

हे दखल पहा -

यावेळी खासदार सुधाकर शृंगारे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह आमदार धीरज देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार बाबासाहेब पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या लोकार्पण सोहळ्यानिमित्त लातुरात टाऊन हॉल इथं जाहीर सभेला ते संबोधित करणार आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लातूर दौऱ्यावर
इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन पडून विदेशी महिलेचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातील लोदगा इथं केंद्र सरकारच्या अंतर्गत चालणाऱ्या ड्रायव्हिंग सेंटरचे उद्घाटन करणार आहेत. मसलगा इथं बांधण्यात आलेल्या देशातील पहिल्या मलेशियन ड्युरा सिस्टीम नुसार उच्च तंत्रज्ञानाच्या पुलाच उद्घाटन करणार असून चार वाजता टाऊन हॉल इथं जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com