Nitin Gadkari : देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर..., गडकरींचं मोठं विधान, पाहा VIDEO

नागपुरात बोलताना नितीन गडकरींनी मोठं विधान केलं.
Nitin Gadkari Latest News
Nitin Gadkari Latest NewsSaam Tv

नागपूर : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दिल्लीत गेले तर राज्यात चंद्रशेखर बावनकुळेंना संधी मिळेल. असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं. ते नागपुरात बोलत होते. त्याचबरोबर जो प्रदेशाध्यक्ष बनतो, तो काय काय होतो हे तुम्ही बघता असं सुद्धा नितीन गडकरी म्हणाले. त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Nitin Gadkari Devendra Fadnavis Latest News)

Nitin Gadkari Latest News
Maharastra Politics : शिंदे गट उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत

भाजप प्रदेशाध्यपदी चंद्रशेख बावनकुळे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांचा नागपूर येथे सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना गडकरींनी हे विधान केलंय.

काय म्हणाले नितीन गडकरी?

नागपुरात सत्कार सोहळ्यानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करताना नितीन गडकरी म्हणाले की, 'चंद्रशेखर बावनकुळे यांना येणाऱ्या काळात पक्षाची सेवा करण्याची संधी आहे. त्यांच्या कर्तृ्त्वावाला वाव मिळणार आहे. आपला पक्ष कार्यकर्त्यांचा आहे, आई मुलाचा पक्ष नाही. एक ऑटो रिक्षा चालवणारा माणूस आपल्या कामाने-कर्तृत्वाने राज्याचा अध्यक्ष झाला हे आपल्या पक्षाचं वैशिष्ट्य आहे'. असं गडकरींनी म्हटलं आहे. (Nitin Gadkari Todays News)

Nitin Gadkari Latest News
सरकारी नोकरीसाठी तरुणींना एखाद्यासोबत झोपावं लागतं; कॉंग्रेस आमदाराचं वादग्रस्त विधान

'बावनकुळे हे पक्षासाठी रात्रंदिवस काम करणारे कार्यकर्ते आहे. आपल्या कामाने त्यांनी नेहमी न्याय दिला, जनतेचं प्रेम मिळवलं. घरची गरिबी असताना त्यांनी त्या परिस्थितीतही स्वत:चा, कुटुंबाचा विचार न करता पक्षाचं काम केलं. म्हणून देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे", असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

'आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष'

'आपला पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथं आमदाराच्या पोटातून, खासदारांच्या पोटातून खासदार आणि मुख्यमंत्र्यांच्या पोटातून मुख्यमंत्री कधी होत नाही. त्यांना सुध्दा अधिकार आहे. आज देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. त्यांच्या वडील गंगाधर फडणवीस यांच्या हाताखाली काम केलं. ते आजारी असताना त्यांनी कधीही राजकारणात संधी द्या, असं सांगितलं नाही. त्यांनी मला फडणवीस यांच्याशी बोलण्यासाठी सांगतील. फडणवीस हे राजकारणात आले आणि त्यांनी स्वकर्तृत्वावर नगरसेवक, महापौर आणि मुख्यमंत्री झाले आहे, असं म्हणत गडकरींनी फडणवीसांचं कौतुक केलं.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com