मी स्वतः मंत्री असलो तरी सरकारच्या फंदात पडत नाही | Nitin Gadkari

'शेतकरी बोसग भरती आणि बोगस अनुदान घेतात ज्यांना असली बदमाशी करायची आहे त्यांनी आमच्या कार्यक्रमात यायचं नाही.'
 Nitin Gadkari
Nitin GadkariSaam TV

नागपूर : मी स्वतः सरकारमधील मंत्री असलो तरी सरकारच्या फंदात पडत नाही, मी आपल्या डोक्याने काम करतो असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केलं आहे. ते आज विदर्भातील शेतकरी (Farmer) उत्पादक कंपन्यांची मार्गदर्शन कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांनी योग्य आणि चांगल्या दर्जाच्या भाज्या आणि फळांचे उत्पादन घ्यायला हवं असं सांगितलं.

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, 'माझी बायको शेती बघते, तिने सांगितले की शेती पंपाला वीज मिळत नाही. सरकार आणि परमेश्वर यांचा आशीर्वाद कधी मिळेल यांचा नेम नाही. त्यामुळं सरकारवर अवलंबून न राहता सोलर पंप (Solar Pump) घेतले पाहिजेत. गावातील तलावाचे खोलीकरण करत येणाऱ्या काळात जलसंवर्धन केलं पाहिजे.

विजेचा आणि पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. ग्रीन हाऊसच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचा भाज्या आणि फळांचे उत्पादन घ्यायला हवं. तसंच तुम्ही घेतलेले उत्पादन बोगस असते. ३० टक्केच क्वॉलिटी असते, शेतकरी बोसग भरती आणि बोगस अनुदान घेतात ज्यांना असली बदमाशी करायची आहे, सबसिडी खायची आहे, त्यांनी आमच्या कार्यक्रमात यायचं नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.

तसंच शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीचे फळ निर्मिती केली पाहिजे८० टक्के संत्री तर चांगल्या क्वॉलिटीचे नसतात. चांगल्या संत्र्याचे कलम तयार केले पाहिजे. शेतकऱ्यांनी नर्सरी सुद्धा तयार करून जागतिक दर्जाचे फळे, फुले आणि झाडं तयार केले पाहिजेत.

 Nitin Gadkari
Vinayak Mete Case : व्हायरल ऑडिओ क्लिपवर विनायक मेटेंच्या पत्नी भावूक, म्हणाल्या... (व्हिडिओ पाहा)

तसंच मी स्वतः सरकारमधील मंत्री असलो तरी सरकारच्या फंदात पडत नाही, मी आपल्या डोक्याने काम करतो. अनेक अडचणी असतात, प्रत्येक जण त्रास देते, म्हणून मी स्वतः पैसे खर्च करतो, नुकसान झालं तरी काही फरक पडत नाही. नागपूरात ऑर्गनिक भाज्या, फळे यांचं मार्केट तयार करत आहोत. शेतकऱ्यांसाठी ऑर्गनिक प्रोडक्टचे मार्केट तयार केले पाहिजे असंही गडकरी यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com