Maharashtra Politics : दोन महिन्यांनी महाराष्ट्रातील राजकारणात काय होणार?; भाजपच्या बड्या नेत्याच्या विधानानं खळबळ

भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे.
Eknath Shinde Devendra Fadnavis
Eknath Shinde Devendra Fadnavis saam tv

Union Minister Raosaheb Danve : भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे. उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.  (Latest Marathi News)

Eknath Shinde Devendra Fadnavis
Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार

काय म्हणाले रावसाहेब दानवे?

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथील शेतीपूरक प्रकल्पाचा शुभारंभ आणि कार्यकर्ता मेळाव्याला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर निशाणा साधला. शिवसेनेच्या पोटात पहिल्यापासून काळे होतं. अडीच वर्षे सरकार चालवले, कुणालाही वाटत नव्हते, ते सरकार जाईल पण अशी जादू झाली की एका रात्रीत शिवसेनेचं सरकार गेलं. असं रावसाहेब दानवे म्हणाले.

असंच राजकारण चालल्यावर आणखी दोन महिन्यानंतर काय होणार आहे, याचा अंदाज कोणी लावला का? तर नाही ना, उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही, असं म्हणत दानवे यांनी खळबळ उडवून दिली आहे. (Maharashtra Politics)

रावसाहेब दानवे केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यामुळे दिल्लीत घडणाऱ्या राजकीय घडामोडी त्यांच्या कानावर येत असतात. याशिवाय त्यांचं महाराष्ट्रातील हालचालीवरही दानवे यांचं बारीक लक्ष असतं. अशातच दानवे यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीबाबत हे विधान केल्यानं आता दोन महिन्यानंतर राज्यात कोणता भूकंप होणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com