'महाराष्ट्र बंद' लोकांचा नव्हे सरकारचा, मविआ सरकार हे कॉपी सरकार!

सप्टेंबर-ऑक्टोबरमष्ये कोळशाची मागणी नेहमी वाढते याची महाराष्ट्र सरकारला जाणीव आहे. पण त्यांना कोळसा पुरवठ्याबाबत पत्र लिहूनही त्यांनी आम्हांला मार्च-एप्रिलमध्ये पत्र लिहून कोळसा पुरवठा थांबवण्याची मागणी केल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
'महाराष्ट्र बंद' लोकांचा नव्हे सरकारचा, मविआ सरकार हे कॉपी सरकार!
रावसाहेब दानवे साम टीव्ही

जालना : महाराष्ट्रात लोडशेडिंग होऊ देणार नाही असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. तर, राष्ट्रवादीने कोळशाच्या वाढत्या दरावरून मोदी सरकारला जबाबदार धरलं आहे. यावर कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्र सरकारवर टिका केलीय. महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारवर टीका करायची सवय झाली असून प्रत्येकवेळी महाराष्ट्र सरकार केंद्रावर टीका करतं. आज कोळसा मंत्रालयाकडे 40 मिलियन टन कोळसा आहे.

भर पावसाळ्यात देखील खाणीतून पूर्वीपेक्षा जास्त कोळसा काढण्याचा प्रयत्न कोळसा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केला. मात्र, पावसाळ्यात कोळसा खाणीतून कोळसा काढणं अवघड असतं. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात नेहमीच विजेची मागणी वाढते. त्यामुळे कोळसा मंत्रालयाने सर्व राज्यांना कोळसा किती लागतो या संदर्भात विचारणा केली होती. महाराष्ट्र सरकारला देखील याबाबतीत विचारणा करण्यात आली होती.

हे देखील पहा :

मात्र, त्यांनी मार्च एप्रिलमध्ये पत्र लिहून कोळशाचा महाराष्ट्र सरकारला होणारा पुरवठा थांबवा, आम्ही कोळसा घेऊ शकत नाही. असं म्हटल्याचा आरोप कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारला हे सर्व माहीत असूनही त्यांणी कोळशाचा साठा करून ठेवला नाही ही त्यांची जबाबदारी होती, असं सांगत कोळसा टंचाईला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा टोला दानवे यांनी मारला आहे. आमच्याकडे 40 मिलियन टन कोळसा आहे आणि वीज निर्मिती केंद्रात 7 मिलियन टन कोळसा उपलब्ध असताना देखील राज्य सरकारने बाहेरून वीज खरेदी करण्याचा निर्णय घेतला असेल आणि त्यात सरकार किंवा मंत्र्यांचा फायदा असेल तर त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही असही त्यांनी स्पष्ट केलं.

रावसाहेब दानवे
Nagpur : पैशांचा पाऊस पाडण्याच्या हव्यासापोटी वाघाच्या बछड्याची शिकार!

बाहेरून येणारा 20 कोळसा 20 टक्क्यांनी महागला आहे. पावसाळ्याआधीच राज्य सरकारने कोळशाचं नियोजन करायला हवं होतं असंही ते म्हणाले. राज्य सरकारने महाराष्ट्रात केलेला बंद हा लोकांचा नव्हे तर सरकारचा बंद होता. पोलिसांनी दुकानं बंद केल्या लोकांना मारहाण केली असंही दानवे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात देखील पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही. महाराष्ट्र सरकार उत्तर प्रदेश सरकारची कॉपी करत असून राज्य सरकार हे कॉपी सरकार असल्याचा हल्ला दानवे यांनी चढवला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.