Nashik|मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे पंकजा मुंडे नाराज ? दानवे म्हणाले...

पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळ विस्तारावर विधान केल्यामुळे त्या राजकीय वर्तुळात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे यांच्या त्या विधानानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Raosaheb Danve
Raosaheb Danvesaam tv

Raosaheb Danve News : 'शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात माझी पात्रता नसल्यामुळे कदाचित वरिष्ठांनी मंत्रिपद दिलं नसावं', असं वक्तव्य पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलं आहे. पकंजा मुंडे यांच्या विधानामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. शिंदे गटातील काही नेत्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळ विस्तारावर विधान केल्यामुळे त्या राजकीय वर्तुळात नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पंकजा मुंडे यांच्या त्या विधानानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Raosaheb Danve
ShivSena Bhavan Dadar: शिंदे गटाकडून थेट मातोश्रीला आव्हान; दादरमध्ये उभारणार प्रति शिवसेना भवन

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रीय मंत्री दानवे यांनी आज, शुक्रवारी पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 'हर घर तिरंगा' अभियानावर भाष्य करताना रावसाहेब दानवे म्हणाले, 'प्रत्येकाने घरावर तिरंगा लावावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अपेक्षा आहे. त्याला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम केंद्रीय मंत्र्यांना दिला आहे'.

वीर सावरकर यांच्यावर स्मारकारवर देखील केंद्रीय मंत्री दानवे यांनी भाष्य केलं. दानवे म्हणाले, 'आपण वीर सावरकरांचं देशासाठी केलेलं बलिदान आठवलं पाहिजे. अंदमानला ज्या कोठडीत सावरकर राहिले, तिथे ७५ लोकांना घेऊन जाण्याचा संकल्प आहे. वीर सावरकर यांच्या स्मारकासाठी जे जे करता येईल, ते ते करू'.

Raosaheb Danve
BJP Maharashtra: भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई शहराध्यक्षपद आशिष शेलारांकडे

अहमदनगर-आष्टी रेल्वेवर भाष्य करताना दानवे म्हणाले, 'अहमदनगर-आष्टी रेल्वेचे परिक्षण पूर्ण झाले आहे. या रेल्वेचे अधिवेशन असल्यामुळे उद्घाटन करता आले नाही .त्याचे लवकरच उद्घाटन करू'. तर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य करताना दानवे म्हणाले, '४०-४२ मंत्र्यांचे मंत्रिमंडळ असते, आता केवळ १८ मंत्री आहेत. केवळ १८ मंत्र्यांवर मंत्रिमंडळ चालू शकत नाही. लवकरच आणखी मंत्रिमंडळ विस्तार होईल'

पंकजा मुंडे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर केलेल्या विधानावर देखील भाष्य देखील केंद्रीय दानवे यांनी केलं. 'पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सदर प्रश्न आमच्या घरातला आहे. त्यावर पक्षातील वरिष्ठ विचार करतील'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com