'आमचे वाद संपले, आता आम्ही ...' अर्जुन खोतकरांच्या भेटीवर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

रावसाहेब दानवे यांनी चंद्रकांत पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्या दिल्लीतील भेटीवर भाष्य केलं.
Raosaheb Danve
Raosaheb Danve saam tv

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी आज कोल्हापुरात चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची भेट घेतली. चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाले. त्यानंतर रावसाहेब दानवे यांनी चंद्रकांत पाटील यांची सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी दानवे यांनी अर्जुन खोतकर यांच्या दिल्लीतील भेटीवर भाष्य केलं. दरम्यान, रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर हे दोघे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात. (Raosaheb Danve News)

Raosaheb Danve
अजित पवार यांच्या टीकेला हवामान विभागाचे प्रत्युत्तर; होसाळीकर म्हणाले...

या भेटीवर रावसाहेब म्हणाले, माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar), एकनाथ शिंदे यांची कोणतीही गुप्त बैठक झाली नाही. त्यांनी सार्वजनिकपणे फोटो काढले आहेत. या भेटीदरम्यान, मागचं सगळं सोडून द्या, असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे आमचे वाद संपले असून वाद आम्ही विसरलो आहोत. सदर बैठक गुप्त नव्हतीच, बैठक सार्वजनिक झाली. आता कोणीही कोणत्याही कोपऱ्यात उभा राहतो आणि व्हिडीओ काढतो, असे त्यांनी सांगितले.

Raosaheb Danve
किती पक्ष,किती काेलांटउड्या, किती भांडण, सत्तेसाठी काहीही.., अभिनेते सयाजी शिंदे (व्हिडिओ पाहा)

रावसाहेब पुढे म्हणाले, '१०५ आमदार भाजपच्या चिन्हावर निवडून आले आहेत. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री याआधी होते, आम्ही काही नवीन केलं नाही. २०१९ ला जनादेश आमच्याकडे असताना फसवणूक झाली. हे आमदारांनाही मान्य नव्हते. शिवसेना प्रमुख हे आमच्यासाठी दैवत आहे. आता राजेशाही संपली आहे. आता राजा मतपेटीतून जन्माला येतो, पोटातून नव्हे. बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी राजेच होते'.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com