अकोल्यातील 'त्या' सहा सिमेंट रस्त्यांचे पिंडदान ! 'आप' चे अनोखे आंदोलन

अकोल्यात बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर 'त्या' 6 सिमेंट रस्त्यांचे पिंडदान केले.
अकोल्यातील 'त्या' सहा सिमेंट रस्त्यांचे पिंडदान ! 'आप' चे अनोखे आंदोलन
अकोल्यातील 'त्या' सहा सिमेंट रस्त्यांचे पिंडदान ! 'आप' चे अनोखे आंदोलनऍड. जयेश गावंडे

ऍड. जयेश गावंडे

अकोला : अकोल्यात बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत आज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर 'त्या' 6 सिमेंट रस्त्यांचे पिंडदान केले. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अनोखं आंदोलन करण्यात आलंय. Unique Agitation By AAP in Akola

अकोल्यातील टॉवर ते रतनलाल प्लॉट चौक, तिलक रोड ते मोहता मिल, मुख्य पोस्ट ऑफिस ते सिव्हिल लाईन, सरकारी बगीचा ते कलेक्टर ऑफिस आणि अशोक वाटिका असे एकूण 6 सिमेंट रस्ते सन 2018 मध्ये बनवले गेले होते.

हे देखील पहा -

मात्र या रस्त्यांचा दर्जा सुमार असल्याने नागरिकांनी तसेच विविध पक्षांच्या वतीने तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सोशल ऑडिट करून तो अहवाल अमरावती आयुक्तांना पाठवला होता. त्या अहवालात रस्त्यांचा दर्जा सुमार असल्याचे दिसून येत असल्याचे नमूद करून अकोला मनपाने आमसभेत कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

अकोल्यातील 'त्या' सहा सिमेंट रस्त्यांचे पिंडदान ! 'आप' चे अनोखे आंदोलन
इंधन दरवाढ विरोधात विरोधात काँग्रेस ची सायकल रॅली

मात्र हा विषय अजूनही अकोला मनपाच्या आमसभेत आला नाही. त्यामुळे कारवाई करण्यासाठी महापालिका टाळाटाळ करत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केलाय. त्यामुळे भ्रष्टाचारी यांना पाठीशी घालत आहेत म्हणून अकोला करांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आज अकोला आम आदमी पक्षाने भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी यांचे पिंडदान आंदोलन महापालिकेसमोर केले. यावेळी अमरावती विभागाचे संयोजक तथा राज्य कार्यकारिणी सदस्य व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com