'या' नगरपंचायतीचा अनोखा उपक्रम; सोलरद्वारे पाच लाख रुपयांची वीज निर्मिती

महाराष्ट्र शासनाच्या अमृत योजना अंतर्गत सोलरची योजना राबवली आहे.
'या' नगरपंचायतीचा अनोखा उपक्रम; सोलरद्वारे पाच लाख रुपयांची वीज निर्मिती
'या' नगरपंचायतीचा अनोखा उपक्रम; सोलरद्वारे पाच लाख रुपयांची वीज निर्मिती गोविंद सोळुंके

शिर्डी नगरपंचायतीच्या मालकीच्या 580 लिटर दशलक्ष क्षमतेच्या पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावावर अडीच कोटी रुपये खर्च करून 1494 सोलर प्यानर प्रकल्फ बसवले आहे. या सोलर प्यानर द्वारे वीज होणार आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शिर्डी नगर पंचायतीचा हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रकल्पद्वारे विजेची आणि पैशाची मोठी बचत होणार आहे.

शिर्डी नगरपंचायतने नवीन अनोखा उपक्रम राबवला असल्याने आता वीज बिलामध्ये चांगला फायदा होणार आहे. वीज बिलामुळे राज्यातील अनेक नगरपंचायतीला आर्थिक भार सहन करावा लागतो पण शिर्डी नगरपंचायतीने हा एक अनोखा उपक्रम राबवल्याने लाखो रुपयांची बचत होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या अमृत योजना अंतर्गत सोलरची योजना राबवली आहे. या आधी वॉटर सप्लायर महावितरण विजबिल महिन्याकाठी तीन लाख रुपये होतं सोलरची योजना सुरू झाल्यानंतर पूर्वीचे तीन लाख रुपये बिल आणि परत दोन लाख रुपयांची वीज मिळते त्या मुळे महिन्याकाठी पाच लाख रुपयांची वीज शिर्डी नगर पंचायत याठिकाणी निर्मिती करत आहे. शिर्डी नगरपंचायतीने अडीच कोटी रुपये खर्च करून जिल्ह्यात एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com