पारनेरमध्ये शर्यतीत बैल उधळले चौखुर, प्रशासनाला पत्ताच नाही
पारनेरमध्ये शर्यत पाहण्यासाठी जमलेली गर्दी.

पारनेरमध्ये शर्यतीत बैल उधळले चौखुर, प्रशासनाला पत्ताच नाही

अहमदनगर ः सध्या कोरोनामुळे सर्वच यात्रा-जत्रा बंद आहेत. धार्मिक कार्यक्रमांनाही बंदी आहे. असे सर्व निर्बंध असतानाही अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील शिरापूर गावात बैलगाडी शर्यंत झाली.

बैलगाडा शर्यत आयोजित केल्याची माहिती मिळताच पारनेर तालुक्याच्या तहसीलदार ज्योती देवरे पोलीस पथकासह गावात दाखल झाल्या. मात्र, पथक पोहोचेपर्यंत शर्यत संपवून सर्व जण निघून गेले होते. यासंबंधी मिळालेल्या व्हिडिओ आणि ग्रामपंचायतीत आढळून आलेल्या रजिस्टरच्या आधारे ७ आयोजकांसह इतर ५६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Unlicensed bullock cart race in Parner taluka

पारनेरमध्ये शर्यत पाहण्यासाठी जमलेली गर्दी.
शरद पवार आमचे आदरणीय, त्यांच्या हातात रिमोट कंट्रोल : नाना पटोले

पारनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. २१ गावांत कडक लॉकडाउन लावण्यात आला आहे. अशा परिस्थितीत शिरापूर गावात बैलगाडी शर्यत झाली. निर्बंध असताना ही शर्यत घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या शर्यतीचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. बैलागाड्यांच्या पुढे एक घोडेस्वार धावताना दिसत आहे. त्याच्यापाठीमागे बैल गाड्यासह चौखुर उधळल्याचे पाहायला मिळते. ही शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गावकरी आणि बैलगाडा शर्यंतप्रेमी जमल्याचे छायाचित्रात दिसते आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असताना पोलिस किंवा तालुका प्रशासनाला याची खबरबात नव्हती, हे विशेष.

शिरापूरमध्ये बैलगाडा शर्यत सुरू असल्याची माहिती कळताच पथक तेथे तोपर्यंत शर्यत पाहणाऱ्यांनी पोबारा केला होता. तहसीलदार ज्योती देवरे यांनी ग्रामपंचायतीचे रजिस्टर तपासले. तसेच ग्रामपंचायत शिपायाच्या मोबाईलमध्ये शर्यतीचे रेकॉर्डिंग आढळून आले. त्यावरून तहसीलदार देवरे यांनी गुन्हे दाखल करण्याचे संबंधितांना आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला बंदी आहे. पश्चिम महाराष्ट्रात यात्रांमध्ये तसेच काही हौशी लोक शर्यतीचे आयोजन करतात. मात्र, यात बैलांवर अत्याचार केला जात असल्याचे समोर आल्याने न्यायालयाने या शर्यती घेण्यास बंदी घातली आहे. Unlicensed bullock cart race in Parner taluka

Editeb By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com