Unseasonal Rain: नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी आणि गारपीटीचा तडाखा, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ

Unseasonal Rain: सर्वाधिक फटका निफाड तालुक्याला बसला असून येथे २४१९ हेक्टरवरील गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Rain
Rain SaamTv

Nashik News : नाशिक जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे. जवळपास ४ हजार हेक्टर क्षेत्राला या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यामुळे ५ हजार शेतकरी अडचणीत सापडले आहे.

प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यात तीन दिवस झालेल्या अवकाळी आणि गारपीटीने ४ हजार १५४ हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. सर्वाधिक फटका निफाड तालुक्याला बसला असून येथे २४१९ हेक्टरवरील गव्हाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. (Latest News)

Rain
Satish Kaushik Passed Away: काही तास आधी मित्रांसोबत होळी सेलिब्रेशन; पाहा सतिश कौशिक यांचे निधनापूर्वीचे फोटो

जिल्ह्यातील ९७९ हेक्टरवरील द्राक्ष बागा, तर ३१४ हेक्टरवरील कांद्याचं नुकसान झालं आहे. पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com