Monsoon: मुंबईसह कोकण, मराठवाड्यात अवकाळी पाऊस; 13 जिल्ह्यात हाय अलर्ट...(पहा व्हिडिओ)

13 जिल्ह्यात हाय अलर्ट
Monsoon: मुंबईसह कोकण, मराठवाड्यात अवकाळी पाऊस; 13 जिल्ह्यात हाय अलर्ट...(पहा व्हिडिओ)
Monsoon: मुंबईसह कोकण, मराठवाड्यात अवकाळी पाऊस; 13 जिल्ह्यात हाय अलर्ट...(पहा व्हिडिओ)Saam Tv

मुंबई : अरबी समुद्रात Arabian Sea हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील एक- दोन दिवसामध्ये याची तीव्रता आणखीच वाढण्याची शक्यता आहे. परिणामी ५ दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागण्याची maharashtra शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील ५ दिवस हवामान विभागाने विविध जिल्ह्यांना तीव्र पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ-

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १९ नोव्हेंबर नंतर याची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे पुढील ५ दिवस किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Monsoon: मुंबईसह कोकण, मराठवाड्यात अवकाळी पाऊस; 13 जिल्ह्यात हाय अलर्ट...(पहा व्हिडिओ)
परमबीर सिंग फरार? घोषित करण्याचा न्यायालयाने निर्णय राखला

हवामान विभागाने आज मुंबईसह, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील ३ ते ४ तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com