UPSC Result: वडिलांची चहाची टपरी, आई विडी कामगार; तर मुलगा आता अख्ख्या जिल्ह्याच्या कारभार हाकणार

UPSC Result: मंगेशने UPSC परीक्षेचा जिद्दीने अभ्यास करत देशात ३९६ वा नंबर मिळवत उत्तीर्ण झाला.
UPSC Mangesh Khilari
UPSC Mangesh Khilari Saam TV

सुशील थोरात

UPSC Success Story: अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर सारख्या ग्रामीण भागात चहा विक्री करून आपले कुटूंब चालवणाऱ्या पाराजी खिलारी यांचा मुलगा मंगेश याने  UPSC परीक्षेत ३९६ वा नंबर मिळवत घवघवीत यश संपादित केलं आहे.

संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील पाराजी खिलारी गावात छोटसं चहा नाष्ट्याचं दुकान चालवतात. तर मंगेशची आई विड्या बनवून कुटूंबाला हातभार लावते. घरची परिस्थिती बेताची असतानाही मंगेशने UPSC परीक्षेचा जिद्दीने अभ्यास करत देशात ३९६ वा नंबर मिळवत उत्तीर्ण झाला.

UPSC Mangesh Khilari
UPSC Topper Ishita Kishore Mock Interview: UPSCमध्ये देशात पहिल्या आलेल्या इशिताची मुलाखत, पॅनलचे प्रश्न आणि इशिताची जबराट उत्तरं

निकाल जाहीर होताच मंगेशच्या कुटुंबिय आणि मित्रांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंद साजरा केला. घरची परिस्थिती बेताची असल्याने मुलानेही शिक्षण घेताना आई वडिलांवर जास्त आर्थिक बोजा पडणार नाही याची काळजी घेतल्याची प्रतिक्रिया वडील पाराजी खिलारी यांनी दिली. (Latest Marathi News)

गरीबीचे दिवस काढत मुलाला शिक्षण दिले आणि आज त्याने आमच्या कष्टाचं चिज केलं असल्याचे सांगताना मंगेशच्या आईला अश्रू अनावर झाले. तर मंगेशने सुरुवातीपासूनच UPSC करण्याचा ध्यास घेतला होता. त्यामुळे त्याने जे ठरवलं ते करून दाखवल्याचं मंगेशचा भाऊ याने सांगितलं.

UPSC Mangesh Khilari
UPSC Maharashtra Topper: ठाण्याची डॉ. कश्मिरा संख्ये राज्यात पहिली; निकालानंतर पहिली प्रतिक्रिया...

परिस्थीती कशीही असली तरी मुलांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम आई वडील करत असतात. आज मंगेशने यशाचा मोठा टप्पा गाठल्याने आई वडिलांच्या कष्टाला फळ मिळालं आहे. इतर तरुणांनीही मंगेशचे अनुकरण केलं तर तेही यशाचा टप्पा गाठू शकतात, एवढं नक्की.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com