UPSC Success Story: सूनेने सासूचा कानमंत्र ऐकून इतिहास घडवला; शुंभागीने अकॅडमीची मदत न घेता मिळवलं मोठं यश

UPSC Success Story: अहमदनगरच्या डॉक्टर शुभांगी पोटे हिनेही सासूचा कानमंत्र ऐकून इतिहास घडवला आहे. संपूर्ण राज्यभर डॉक्टर शुभांगी पोटे हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
UPSC Success Story
UPSC Success StorySaam tv

सुशील थोरात

Ahmednagar News: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या 2022 च्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. इशिका किशोर हिने UPSC परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्यातही UPSC परीक्षेत मुलींचाच डंका पाहायला मिळाला. अहमदनगरच्या डॉक्टर शुभांगी पोटे हिनेही सासूचा कानमंत्र ऐकून इतिहास घडवला आहे. संपूर्ण राज्यभर डॉक्टर शुभांगी पोटे हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२२ परीक्षेत मुलींचा डंका पाहायाला मिळाला. अहमदनगर शहरातील डॉक्टर शुभांगी पोटे हिने यूपीएससी स्पर्धेत पाचशे तीस क्रमांक मिळवून या परीक्षेत यश मिळवले आहे. डॉक्टर शुभांगी पोटे हिने कोणत्याही क्लासची अथवा स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या अकॅडमीची मदत न घेता स्वत:च्या अभ्यासावर यश संपादन केलं आहे.

UPSC Success Story
UPSC Result: वडिलांची चहाची टपरी, आई विडी कामगार; तर मुलगा आता अख्ख्या जिल्ह्याच्या कारभार हाकणार

डॉ. शुभांगीचे सासू-सासरे घर प्रपंच आणि सहा वर्षाच्या मुलाला सांभाळत या परीक्षेत यश मिळवले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२२ परीक्षेत मिळवलेल्या यशावर डॉ. शुभांगी म्हणाली, 'मनात फक्त जिद्द ठेवली होती. त्याचबरोबर सासूने दिलेला कानमंत्र तो म्हणजे मी माझ्या काळात शिकले नाही. मात्र, तू शिकून पुढे जा'.

'मी हा मंत्र मनात ठेवून अभ्यास करत राहिले. लहान मुलाला सांभाळायला पतीने जबाबदारी घेतल्यामुळे आणि प्रोत्साहन दिल्यामुळे हे यश प्राप्त झाले', असेही ती म्हणाली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा २०२२ परीक्षेत यश मिळाल्याचा आनंद डॉ. शुभांगीच्या चेहऱ्यावर दिसत होता.

UPSC Success Story
KASHMIRA SANKHE EXCLUSIVE :UPSC परीक्षेत Kashmira Sankhe राज्यात पहिली! काय म्हणाली कश्मिरा संख्ये?

अहमदनगरमधील मुलगा आता अख्ख्या जिल्ह्याच्या कारभार हाकणार

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर सारख्या ग्रामीण भागात चहा विक्री करून आपले कुटूंब चालवणाऱ्या पाराजी खिलारी यांचा मुलगा मंगेश याने UPSC परीक्षेत ३९६ वा नंबर मिळवत घवघवीत यश संपादित केलं आहे. मंगेशने UPSC परीक्षेचा जिद्दीने अभ्यास करत देशात ३९६ वा नंबर मिळवत उत्तीर्ण झाला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com