Crime News : दारु तस्करीसाठी समृद्धी महामार्गाचा वापर; वर्ध्यात कारसह लाखोंचा दारुसाठा जप्त

समृद्धी महामार्गाने विटाळा शिवारात एका शेतातील कच्च्या रस्त्यावर कार उभी करुन पळ काढला.
Wardha News
Wardha NewsSaam TV

चेतन व्यास

वर्धा : दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी करण्यासाठी दारुविक्रेते समृद्धी महामार्गाचा वापर करत आहेत. अमरावती जिल्ह्यातून दारुसाठा समृद्धीमहामार्गावरुन वर्ध्यात आणत असेलेल्या दारु तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेने सुसाट कारवाई सुरु केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाईकरिता समृद्धी महामार्गांवर सापळा रचला.

मात्र दारु तस्करांना याचा सुगावा लागताच त्याने पोलिसांच्या पथकाला जवळपास चार ते पाच तास मागे मागे फिरवले. अखेर गुन्हेगारांनी दारुने भरलेली कार सोडून पळ काढला. पोलिसांनी अमरावतीच्या विटाळ येथे शेतातील कच्च्या रस्त्यावरुन कारसह ९ लाख २६ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त करत आरोपी कार चालक सोनू उर्फ योगेश विश्वकर्माविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Wardha News
Political News : खासगीकरणाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; म्हणाले,'९ खासगी कंपन्या...'

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रगस्तीवर असताना अमरावती जिल्ह्यातून समृद्धी महामार्गावरुन दारुसाठा आणत असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी केली. मात्र आरोपींनी कार समृद्धी महामार्गवरून नागपूरच्या दिशेने फिरवली. पोलिसांनीही वाहनाचा पाठलाग सुरु केला. आरोपीने कार हळदगाव मार्गाने नेली. तेथून तो पवनार गावात आला आणि बायपास मार्गाने जुनापाणी चौकात आला, पोलिस त्याच्या मागावरच होते. (Latest News)

Wardha News
Viral Video : तरुणांचा 'कार'नामा! धावत्या कारमधून फेकल्या 500-2000 नोटा; नेमकं घडलं तरी काय?

अखेर चालकाने समृद्धी महामार्गाने विटाळा शिवारात एका शेतातील कच्च्या रस्त्यावर कार उभी करुन पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारची पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्यसाठा आढळून आला. कारसह एकूण ९ लाख २६ हजारांचा दारुसाठा जप्त करत आरोपीविरुद्ध सावंगी पोलिसात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com