लहान मुलांना लस अन् जेष्ठांना बूस्टर डोस देण्याची केंद्राकडे मागणी- टोपे

11 ते 20 वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढलं आहे. राज्यात 1 हजार 711 मुलं कोरोनाबाधित आढळून आले आहे.
लहान मुलांना लस अन् जेष्ठांना बूस्टर डोस देण्याची केंद्राकडे मागणी- टोपे
लहान मुलांना लस अन् जेष्ठांना बूस्टर डोस देण्याची केंद्राकडे मागणी- टोपेSaam TV

जालना : 11 ते 20 वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढलं आहे. राज्यात 1 हजार 711 मुलं कोरोनाबाधित आढळून आले आहे. अलीकडच्या 20 दिवसांतील ही आकडेवारी आहे. ही गोष्ट खरी आहे. लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. या मुलांचं लसीकरण तातडीने केलं पाहिजे असं टास्क फोर्सचही मत आहे. असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. शिवाय मुलांना लसीकरण करण्यासाठी आणि ज्येष्ठांना बूस्टर डोस देण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे ते जालन्यात बोलत होते.

दिवाळीनंतर दुसरया सत्रात शाळेचे सर्वच वर्ग भरवण्याची मागणी आता पालकांकडून होऊ लागली आहे. त्यामुळे 5 वी पासून पुढील वर्ग आधीच उघडले असून 1 ली ते 4 थी पर्यंतचे वर्ग भरवण्यास शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आलं असून याबाबत आता मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही टोपे म्हणाले. राज्यात चिकून गुनियाचं प्रमाण वाढलं असून या संदर्भात नागरिकांनी काळजी घ्यावी तसेच आरोग्य विभागाला देखील उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आल्याचं ते म्हणाले. राज्यात नोव्हेंबर अखेर पर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचं टार्गेट ठेवण्यात आलं असून फार फार तर 15 डिसेंबरपर्यंत पहिल्या डोसचं लसीकरण पूर्ण होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com