स्थानिकांना खूनाच्या गुन्ह्यांत राणेंनी गाेवले; आमदार नाईक

स्थानिकांना खूनाच्या गुन्ह्यांत राणेंनी गाेवले; आमदार नाईक
vaibhav naik narayan rane

सिंधुदुर्ग : कळणे मायनिंग सारखा विनाशकारी प्रकल्प स्थानिकांच्या माथी मारण्याचे काम 13 वर्षापूर्वी राज्याचे तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थ तसेच शिवसेनेचा प्रकल्पाला असलेला विरोध झुगारून प्रकल्प लादण्याचं काम राणेंनी केलं असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी येथे केला आहे. त्यावेळी ३०२ सारख्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अडकवून स्थानिकांना तुरुंगात टाकण्याचे काम देखील राणेंनी केले होते असेही आमदार नाईक यांनी नमूद केले. (vaibhav-naik-criticizes-narayan-rane-kalane-mining-project-sml80)

आमदार नाईक यांनी कळणे मायनिंग प्रकल्पाबाबत केंद्र सरकारने भुमिका स्पष्ट करावी असेही म्हटले आहे vaibhav naik narayan rane.

आमदार नाईक म्हणाले या प्रकल्पामधून हजारो लोकांना रोजगार देण्याचे आमिष त्यावेळी दाखविण्यात आले. परंतु गेल्या १३ वर्षात कळणे मायनिंग प्रकल्पामुळे किती लोकांना रोजगार मिळाला हे राणेंनी एकदा जाहीर करावे. आत्ता जिल्ह्यात पुरपरीस्थिती उद्भवतेय, डोंगर खचतायत याला कळणे मायनिंग पासून सुरुवात झाली आहे असा दावा आमदार नाईक यांनी केला आहे.

vaibhav naik narayan rane
मी आज फार आनंदित झालाेय : नारायण राणे

त्यामुळे आता नारायण राणेंनी केंद्रीय उद्योगमंत्री झाल्यानंतर कळणेवासियांच्या जीवावर बेतलेल्या या कळणे मायनिंग प्रकल्पाबाबत व येथील पर्यावरण संदर्भात केंद्र सरकारची भुमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com