ट्रकवरील ताबा सुटल्याने चालकाचा मृत्यू
accident

ट्रकवरील ताबा सुटल्याने चालकाचा मृत्यू

सोलापूर : ट्रक चालकास पहाटे झोप लागल्याने वाहनावरील ताबा सुटला आणि त्याचा ट्रक पलटी झाल्याने या अपघातात चालकाचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात ट्रकवर असलेला क्लिनर सावधगिरीमुळे थोडक्यात बचावला आहे. हा अपघात सोलापूर जिल्ह्यातील वैराग नजीकच्या उस्मानाबाद चौकात पहाटेच्या सुमारास झाला. vairag-truck-driver-died-solapur-accident-news-sml80

accident
वृद्धास मारहाण केलेल्या त्या युवकास सातारा पाेलिस शाेधणार?

पाेलिसांनी व घटनास्थळावरुन मिळालेल्या प्राथमिक माहितीनूसार जालना येथून एमएच १२ एफसी ८४१३ हा ट्रक सुमारे २५ टन बांधकामची सळई घेऊन सोलापूरच्या दिशने चालला हाेता. पहाटे तीनच्या सुमारास वैराग ओलांडून उस्मानाबाद चौकात ट्रक आला असता चालकास झोप अनावर झाली. यावेळी समोरून एक टेम्पो आला.

या गडबडीत ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. धोकादायक वळनावरून ट्रक रस्त्यावरून खाली जाऊन उलटला. यावेळी ट्रक चालक पीरसाहब नदाफ याचा केबिनखाली सापडून जागीच मृत्यू झाला. या अपघातात ट्रकचे पंधरा हजारांचे नुकसान झाले आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.