वसमतमध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना आमदाराची गाडी अडवली

बांगर हे आपल्या विधानावर ठाम असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवत आंदोलन (Protest) केले आहे
Vanchit
Vanchit Saam Tv

हिंगोली: हिंगोलीच्या वसमतमध्ये शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांना वंचित कार्यकर्त्यांनी अडवले आहे. आमदार संतोष बांगर हे वसमतमध्ये एका विकास कामाच्या उद्घाटन कार्यक्रमाला जात असताना हा प्रकार घडला आहे (Vanchit Activists Blocked The Vehicle Of Shivsena MLA In Basmat Hingoli).

Vanchit
शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

तीन दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुकीत (Election) एक हजार कोटी रुपये घेतल्याचा आरोप शिवसेना (Shivsena) आमदारांनी केला होता. त्यानंतर राज्यभरात वंचितकडून जोरदार निदर्शने करत आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी तातडीने पुरावे सादर करावे अन्यथा जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली होती.

मात्र, बांगर हे आपल्या विधानावर ठाम असल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अडवत आंदोलन (Protest) केले आहे. दरम्यान, पोलिसांनी (Police) घटनास्थळी दाखल होत आमदार बांगर यांना इतर मार्गाने बाहेर काढून देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com