Lok Sabha Election: वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या ४८ जागा लढवणार; प्रकाश आंबेडकरांची घोषणा

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतलाय.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSaam Tv

Prakash Ambedkar on Lok Sabha Election:

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतलाय. राज्यातील सर्वच ४८ जागांवर आपले उमेदवार देणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलीय. (Latest News)

आम्ही सर्व ४८ जागांसाठी निवडणूक लढवणार असून त्यादृष्टीकोनात लोकसभेसाठी तयारी सुरू केली असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिलीय. मुंबईतील पक्षाच्या मुख्यालयात ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपाबद्दल अद्याप स्पष्टता आली नाही. तर महाविकास आघाडीत शिवसेनेला किती जागा मिळतील हे निश्चित नाही. त्यात त्यांचा मित्रपक्ष वंचित बहुजन आघाडीला किती जागा, मिळतील याचा संभ्रम होता.

परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीनं निवडणुकीविषयी ही घोषणा केलीय. दरम्यान लोकसभेच्या निवडणुकीच्या माहिती देताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. खरगे यांच्याकडून इंडिया आघाडीत समाविष्ट करून घेण्याविषयी कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. इंडियामध्ये सहभाग होण्यासाठी काँग्रेससोबत संवाद साधण्यासाठी वंचित बहुजन पक्षाकडून खूप प्रयत्न केले गेले, परंतु काँग्रेस पक्षाने योग्य प्रतिसाद दिला नसल्याचं आंबेडकर म्हणाले.

इंडिया आघाडीमध्ये सामाविष्ट होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून कोणताचा प्रस्ताव आला नसल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आले. परंतु काँग्रेसला १ सप्टेंबर रोजी पत्र पाठवण्यात आल्याचा दावा वंचितकडून करण्यात आला. सर्व अटी आणि शर्तीवर चर्चा करण्यासाठी वंचित तयार होते, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. दरम्यान काँग्रेसकडून महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्याच आमंत्रण येईल यासाठी वंचित बहुजन आघाडीने ११ तासापर्यंत वाट पाहिली. परंतु आमंत्रणाचे कोणतेच चिन्ह दिसत नसल्याचे लक्षात येताच प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी घोषित केली.

Prakash Ambedkar
Wanchit Aghadi News | वंचित आघाडीला INDIA आघाडीमध्ये निमंत्रण आलं? काय म्हणाले वंचितचे प्रवक्ते ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com