प्रेमात धोका झाल्याने आत्महत्या करायला गेलेल्या तरुणाचा पोलिसांनी वाचवला जीव!

मुंबईत राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचे वसईत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध होते. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांच्या लग्नाला उशीर लागत होता. दरम्यान, त्याच्या प्रेयसीने दुसरे लग्न केले.
प्रेमात धोका झाल्याने आत्महत्या करायला गेलेल्या तरुणाचा पोलिसांनी वाचवला जीव!
प्रेमात धोका झाल्याने आत्महत्या करायला गेलेल्या तरुणाचा पोलिसांनी वाचवला जीव!चेतन इंगळे

चेतन इंगळे

वसई/विरार : मुंबईत (Mumbai) राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचे वसईत राहणाऱ्या एका मुलीशी प्रेमसंबंध (Love) होते. मात्र, टाळेबंदीमुळे त्यांच्या लग्नाला उशीर लागत होता. दरम्यान, त्याच्या प्रेयसीने दुसरे लग्न केले. यामुळे हा तरुण निराश झाला आणि शनिवारी सकाळी आत्महत्या (Suicide) करण्यासाठी वसई पूर्वेच्या भागवत टेकडीवर आला. या प्रकारची माहिती मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त जयकुमार यांना मिळताच सकाळी सव्वा अकरा वाजता वालीव पोलिसांना कळवले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस कर्मचारी बालाजी गायकवाड आणि सचिन बळीद यांनी लगेच त्या ठिकाणी धाव घेतली.

हा तरुण ज्या टेकडीवर होता ती टेकडी अडीच हजार फूट उंचीवर होती. बळीद आणि गायकवाड यांनी त्याला फोन वर बोलण्यात गुंगवून ठेवले आणि त्याला आत्महत्या करण्यपासून रोखले. पोलिसांना पोहोचण्यात ५ मिनिटे जरी उशीर झाला असता तरी त्याने खाली उडी मारून जीव दिला असता. या वेळी त्याच्याशी बोलत राहणे, धीर देणे गरजेचे होते. त्याला बोलण्यात व्यस्त ठेवले, अशी माहिती पोलीस नाईक बळीद यांनी दिली.

दोन पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून या तरुणाला बोलण्यात व्यस्त ठेवले, आणि सुमारे दोनशे पायऱ्या वर चढून त्या तरुणाला वाचवले, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पाटील यांनी दिली. हा तरुण व्यावसायिक असून त्याची वसईत कंपनी आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com