Vat Purnima 2023: अशी बायको नको रे बाबा! छत्रपती संभाजीनगरमध्ये पुरूषांनी साजरी केली 'पिंपळ पौर्णिमा'

Pimpal Purnima: या जन्मातच काय पुढच्या सातजन्मी सुद्धा अशी बायको नको, असं म्हणत छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नीपीडित पुरूषांनी वटपौर्णिमेचा सण साजरा केला आहे.
Vat Purnima 2023 Chhatrapati Sambhaji Nagar men celebrate Pimpal Purnima in Waluj Area
Vat Purnima 2023 Chhatrapati Sambhaji Nagar men celebrate Pimpal Purnima in Waluj Area Saam TV

Chhatrapati Sambhaji Nagar Pimpal Purnima: उद्या म्हणजेच शनिवारी (३ जून) वटपौर्णिमेचा सण आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून प्रार्थना करतात. मात्र, या जन्मातच काय पुढच्या सातजन्मी सुद्धा अशी बायको नको, असं म्हणत छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्नीपीडित पुरूषांनी वटपौर्णिमेचा सण साजरा केला आहे. (Breaking Marathi News)

Vat Purnima 2023 Chhatrapati Sambhaji Nagar men celebrate Pimpal Purnima in Waluj Area
Sangli Crime News: घरातील वस्तू चोरी गेल्याचा राग, वहिनीने केली लहान दिराची हत्या; भयानक घटनेनं सांगली हादरली

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरातील वाळूज परिसरामध्ये आज पत्नीपीडित पुरुषांनी पिंपळ पौर्णिमा साजरी केली. सात जन्मच काय सात सेकंद देखील आम्हाला ही बायको नको,असा घोषणा देत पिंपळाच्या झाडाला उलट्या 108 प्रदक्षिणा घालत त्यांनी पूजन केले.

छत्रपती संभाजीनगर २०१७ पासून पत्नी पीडित संघटना ही राज्यभरातील पत्नीपीडित पतीसाठी काम करीत आहे. यासाठी वाळूज परिसरात पत्नी पीडितांच्या निवासासाठी पत्नी पीडित आश्रम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी राज्यभरातून आतापर्यंत जवळपास नऊ हजार पत्नी पीडितांनी नोंदणी केली आहे. अनेक पीडित बायकोपासून सुटका व्हावी म्हणून न्यायालयीन लढा देत आहे. (Latest Marathi News)

Vat Purnima 2023 Chhatrapati Sambhaji Nagar men celebrate Pimpal Purnima in Waluj Area
Maharashtra Politics: ठाकरे गटाचे उर्वरित आमदार, खासदारही फुटणार; शिंदे गटाने आखला नवा प्लान

मात्र, त्यांना न्याय मिळत नसून प्रचंड मानसिक त्रास सहन करावे लागत आहे. त्यासाठी पत्नी पीडित आश्रमाच्या माध्यमातून मदत केली जात आहे. घरातून हाकलून दिलेल्या पुरुष या ठिकाणी राहतात. वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाचे पूजन करून कुटुंबाची आणि पतीच्या आरोग्यासाठी देवाकडे साकडे घालतात.

मात्र, हे जर खरे असेल तर वडाच्या ऐवजी पिंपळाची पूजा करून बायको पासून सुटका मिळावी म्हणून विनवणी करण्यासाठी हे पूजन करण्यात येत आहे. पिंपळ हे लग्न न झालेला व्यक्तीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे पिंपळाची १०८ उलट्या प्रदक्षिणा घालत पूजा करून बायको पासून सुटका व्हावी अशी विनंवणी पत्नी पीडित पुरूषांनी केली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com