राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा औरंगाबादजवळ अपघात

औरंगाबाद जवळील वाळूज येथे हा अपघात घडल्याची माहिती आहे. या ताफ्यातील गाड्यांचा दोनवेळा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.
राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाड्यांचा औरंगाबादजवळ अपघात
Vehicles belonging to Raj Thackeray's convoy crashed near AurangabadSaam Tv

औरंगाबाद : मनसेची (MNS) १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेसाठी राज ठाकरे आज औरंगाबादमध्ये निघाले आहेत. यादरम्यान राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला आहे. औरंगाबाद जवळील वाळूज येथे हा अपघात घडल्याची माहिती आहे. या ताफ्यातील गाड्यांचा दोनवेळा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

Vehicles belonging to Raj Thackeray's convoy crashed near Aurangabad
Aurangabad | अमित ठाकरे औरंगाबादमध्ये, राज ठाकरेंच्या सभेला कोणकोणते नेते उपस्थित राहणार?

या अगोदर घोडेगाव येथे काही वेळांपूर्वी ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये दोन गाड्यांचे नुकसान झाले होते. वाळूज येथे पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या गाडीलाही अपघात झाला आहे. या अपघातात बारा गाड्यांचे नुकसान झाले आहे. राज ठाकरे औरंगाबादेत पोहचले आहेत.

उद्या औरंगाबादमध्ये मनसेची सभा होणार आहे. या सभेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या सभेवर राज्यातून टीका होतं आहेत. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला इशारा दिला होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.