अवैध वाळू तस्करीत सामील असणाऱ्या वाहनांची कायमची जप्ती होणार

शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या शहादा तालुक्यातील शेल्टी येथून ७० ब्रास वाळू जप्त केली असून जप्तीची कारवाई सुरू आहे.
अवैध वाळू तस्करीत सामील असणाऱ्या वाहनांची कायमची जप्ती होणार
अवैध वाळू तस्करीत सामील असणाऱ्या वाहनांची कायमची जप्ती होणारSaamTvNews

नंदुरबार : शासनाचा महसूल बुडवून अवैधरित्या वाळू उत्खनन करणाऱ्या शहादा तालुक्यातील शेल्टी येथून ७० ब्रास वाळू जप्त केली असून जप्तीची कारवाई सुरू आहे. नदी (river) आणि नाल्यांना पाणी कमी होत असून अवैधरित्या वाळू (Sand) उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या वाहनांबाबत तहसील कार्यालयास मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत.

हे देखील पहा :

शहादा (Shahada) तालुक्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी तपासणी पथके तयार करून अवैध वाळू उपशाविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे अवैध वाळू व गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना दंड (Fine) ठोठावून ही पुन्हा वाहतूक करत असल्याचे समोर आल्याने अशा वाहनांवर (Vehicles) व व्यक्तींवर सक्त कारवाई करून वाहने कायमची जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शहादा तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी दिला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com