विदर्भवासियांना मिळणार दिलासा! पावसाच्या शक्‍यतेसह तापमानात होणार मोठी घट!

विदर्भातील जनतेला होरपळून काढणाऱ्या उन्हापासून दिलासा मिळणार आहे. सध्या विदर्भाच्या बऱ्याच भागात ढगाळ हवामान असून, उकाडा कमी आहे. विदर्भातील तापमान 45 अंशावर गेलंय.
Vidarbha Temperature Update
Vidarbha Temperature UpdateSaam Tv

संजय डाफ

नागपूर: विदर्भातील जनतेला होरपळून काढणाऱ्या उन्हापासून दिलासा मिळणार आहे. सध्या विदर्भाच्या बऱ्याच भागात ढगाळ हवामान असून, उकाडा कमी आहे. विदर्भातील तापमान 45 अंशावर गेलंय. त्यामुळं विदर्भातील जनतेची अक्षरशः लाही लाही होतेय. मात्र, मध्य प्रदेशावर एक द्रोनिका तयार झालीय. त्याचा परिणाम विदर्भावर होतोय. “विदर्भात पुढच्या दोन तीन दिवसांत ३-४ अंश सेल्सिअस तापमानात घट होण्याची शक्यता आहे, त्यासोबत येत्या पाच दिवसांत काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

केरळमध्ये मॅान्सून चार दिवस आधी आहे, मात्र तरिही विदर्भात मॅान्सूनसाठी काही दिवस वाट पाहावी लागेल, या महिन्यात शेवटी याबाबत हवामान विभाग आपला अंदाज वर्तवेल” असं मत नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ मोहनलाल शाहू यांनी व्यक्त केलाय.

Vidarbha Temperature Update
राखी सावंतला मिळालं नवं प्रेम, प्रियकराने ने भेट दिली BMW, म्हणाली...

राज्यातील ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट;

काही तासामध्येच मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर येऊन धडकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. तसेच कोकण किनारपट्टीबरोबरच राज्यात ९ जिल्ह्यांना यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या २ दिवसामध्ये केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची (Rain) शक्यता हवामान खात्याने (Weather Department) वर्तवले आहे.

१६ ते १९ मेच्या दरम्यान, महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यात कोल्हापूर, सातार, सांगली तसेच मराठवाड्यामधील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणामधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com