शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याचा Video सोशल मीडियावर Viral!

जालन्यातील भोकरदनचे शिवसेना तालुका प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य नवनाथ दौड यांचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. भाजपचे कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा त्यांनी केलाय.
शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याचा Video सोशल मीडियावर Viral!
शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याचा Video सोशल मीडियावर Viral !SaamTvNews
  • जालना : शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

  • भाजप कार्यकर्ते विकासकामात अडथळा आणून जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचा आरोप

  • पोलिसांत तक्रार दाखल करणार, पोलीस संरक्षण देण्याचीही केली व्हिडीओतुन मागणी.

हे देखील पहा :

जालन्यातील भोकरदनचे शिवसेना तालुका प्रमुख नवनाथ दौड यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. नवनाथ दौड हे जालना जिल्हा परिषदेचे शिवसेनेचे सदस्य आहे. जिल्हा परिषद गटात विकासकामे करताना भाजप नेत्यांच्या सांगण्यावरुन भाजप कार्यकर्ते त्रास देऊन कामात अडथळा आणत असल्याचा आरोप दौड यांनी केलाय.

शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याचा Video सोशल मीडियावर Viral !
धावत्या ट्रेनमध्ये मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्याला डोंबिवली RPFने पकडले
शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याचा Video सोशल मीडियावर Viral !
"अंघोळ केल्यावर पाप धुवून जाईल" म्हणत 18 वर्षाच्या मुलीवर मौलवीकडून बलात्कार!
शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याचा Video सोशल मीडियावर Viral !
प्रणयक्रीडा करणाऱ्या सापांना पकडणं जीवावर बेतलं; सर्पदंशाने तरूणाचा मृत्यू!

स्मशानभूमीसह सिंगल फेज योजनेच्या कामात भाजप कार्यकर्ते अडथळे आणत असून कामं केल्यास कुटुंबासह तुला जीवे मारून टाकू अशा धमक्या भाजप कार्यकर्त्यांनी दिल्याचा आरोप दौड यांनी केलाय. भाजपचे कार्यकर्ते सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्यानं पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केलीय. धमक्या देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधात भोकरदन पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याच देखील दौड यांनी म्हटलंय.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com