आरोप सिद्ध केले नाहीतर ५० कोटींचा दावा ठोकणार; वडेट्टीवारांचा पडळाकांना इशारा

एक जरी आरोप तू सिद्ध करुन दाखवलास तर मी राजकारण सोडून देईल
आरोप सिद्ध केले नाहीतर ५० कोटींचा दावा ठोकणार; वडेट्टीवारांचा पडळाकांना इशारा
आरोप सिद्ध केले नाहीतर ५० कोटींचा दावा ठोकणार; वडेट्टीवारांचा पडळाकांना इशारा

नागपूर: गोपीचंद पडळकरांनी माझी छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. पण ही फॅक्ट्री कुठे आहे, त्याचा त्यांनी पत्ता काढावा. माझ्या कोणत्या नातेवाईकाची ही फॅक्ट्री आहे, हेदेखील सांगावं. माझी कोणत्याही दुकानात भागिदारी नाही. असेल तर पुराव्यानिशी सिद्ध कर, नाही सांगितलं तर मी तुझ्यावर ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करेन, असा इशाराच राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपा नेते गोपीचंद पडळकरांना दिला आहे.

हे देखील पहा-

छत्तीसगडमध्ये वडेट्टीवारांची फॅक्ट्री असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. यावर संतप्त वडेट्टीवारांनी पडळकारांना आरोप सिद्ध करण्याचे थेट आव्हान दिले आहे. पडळकरांनी केलेल्या आरोपांवर वडेट्टीवारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. '' ऐकीव गोष्टींवर विश्वास ठेवून आरोप करु नकोस, तुला जे काही बोलायचं असेल तर पुराव्यानिशी बोल. बेछूटपणे काही आरोप करू नकोस. कुठल्याही दुकानात माझी भागीदारी असेल, माझ्यावर लावलेला एक जरी आरोप तू सिद्ध करुन दाखवलास तर मी राजकारण सोडून देईल, पण जर तू आरोप सिद्ध करु शकला नाहीस तर तुझ्यावर ५० कोटींचा दावा दाखल करेल आणि तुला चंद्रपूर गडचिरोलीच्या चकरा मारायला लावेल, अशा इशारा वडेट्टीवारांनी दिला आहेत.

आरोप सिद्ध केले नाहीतर ५० कोटींचा दावा ठोकणार; वडेट्टीवारांचा पडळाकांना इशारा
BJP- Shivsena नाराज सुरेश गंभीर पुन्हा शिवसेनेत येणार?

तसेच आजपर्यंत मी कोणाचा एक रुपयाही घेतला नाही, चहाचाही रुपया कधी ठेवला नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे. पण फुकटच्या प्रसिद्धीसाठी अशा प्रकारचे बेताल आणि बेछूट आरोप करण सोडून दे, जर माझी किंवा माझ्या कोणत्याही नातेवाईकाच्य नावाने छत्तीसगडमध्ये फॅक्ट्री असेल तर शोधून आण, तुझ्या नावाने ती करुन देईल. आरोप आम्हालाही करता येतात. पण राजकारणात विरोधकांचाही मान ठेवायचा असतो, त्यामुळे केलेल्या आरोपांवर माफी माग नाहीतर पश्चाताप भोगायला तयार रहा असा निर्वाणीचा इशाराही विजय वडेट्टीवारांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com