
गोंदिया : पडळकर नया नया पंछी असून नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है अशा शब्दात आमदार गाेपीचंद पडळकर यांचा राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वड्डेट्टीवार यांनी समाचार घेतला आहे. गोपीचंद पडळकर यांना ज्ञान नसल्याचे वड्डेट्टीवार यांनी नमूद केले आहे. ते आज गोंदियात (gondia) प्रचारसभेसाठी आले हाेते. (vijay wadettiwar on gopichand padalkar about obc reservation)
विजय वडेट्टीवारांनी (vijay wadettiwar) टक्केवारीसाठी "फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं" अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केली अशी जहरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalkar) यांनी केली हाेती. त्यास वडेवट्टीवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
वड्डेटीवार म्हणाले ज्या माणासावर लूटमारी, फसवणूक, शेती ढापने, एट्रोसिटी सारखे गुन्हे लागले आहेत त्याच्या वक्तव्यावर बोलणे चुकीचे ठरेल. मागास आयोग ही स्वायत्त संस्था असून आम्ही त्यांच्या खात्यात पाच काेटी रुपये दिले आहेत. त्यांनी त्याचा वापर कसा करावा हे त्यांनी ठरवावे असा सल्लाही वड्डेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी दिला आहे.
edited by : siddharth latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.