Maratha Reservation : मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध नाही, ओबीसीतून देणार असाल तर रस्त्यावर उतरू: विजय वडेट्टीवार

कुणबी ओबीसी म्हणून आंदोलनात सहभागी व्हावे, पक्षाचा व्यक्ती म्हणून आल्यास आंदोलनात सहभागी करून घेतले जाणार नाही असे समितीने स्पष्ट केले आहे.
vijay wadettiwar
vijay wadettiwarsaam tv

Nagpur News : मराठ्यांच्या आरक्षणाला (Maratha Reservation) आमचा विरोध नाही, पण ओबीसी (other backward class) मधून सरकार ते देणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar latest marathi news) यांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra News)

vijay wadettiwar
Mumbai High Court News : विठ्ठल मंदिर बडवे उत्पातांच्या ताब्यात देण्यास सरकारचा विराेध, उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर

सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विरोध दर्शविला आहे. उद्या होणाऱ्या कुणबी ओबीसी आंदोलनाला वडेट्टीवार यांनी पाठिंबा दिला आहे.

vijay wadettiwar
Rajaram Sahakari Sakhar Karkhana : महादेवराव महाडिक गटास माेठा धक्का, 'राजाराम' चे 1272 सभासद अपात्र; सतेज पाटील कारखाना ताब्यात घेणार?

ते म्हणाले उद्याच्या आंदोलनात मी देखील सहभागी होणार आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर EWS च्या धर्तीवर वेगळे द्या असेही त्यांनी सूचवले आहे. तसेच वंशावळीत कुणबी असा उल्लेख असलेल्यांना ओबीसी B असं आरक्षण द्या असे त्यांनी नमूद केले.

सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन

सर्व शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन (kunbi obc aandolan) कृती समिती उद्यापासून (रविवार) एल्गार पुकारणार असल्याचे समितीच्यावतीने प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत सांगितले. समाजाच्या सर्व संघटनांचं उद्या ११ वाजता संविधान चौकात आंदोलन करण्यात येणार आहे.

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणी विरोधात ओबीसींचं आंदोलन छेडले जाणार आहे. सरकारकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत ओबीसांचं हे आंदोलन सुरु राहणार असल्याचे समितीने स्पष्ट केले.

vijay wadettiwar
Pankaja Munde In Kolhapur : देवी आई..., दुसऱ्याच्या दारात जायची वेळ येऊ नये : पंकजा मुंडे (पाहा व्हिडिओ)

सर्वशाखीय कुणबी, ओबीसी आंदोलन कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन केले जाणार आहे. उद्यापासून धरणे आंदोलन, तर सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला तर उपोषण करु असेही समितीने स्पष्ट केले आहे.

अशी आहे भूमिका

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये.

परराज्यातील लोकांना कुठल्याही कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्रातील जात प्रमाणपत्र देऊ नये.

जातीनुसार जनगणना करावी, ५२ टक्के ओबीसी समाजाला ५२ टक्के आरक्षण द्यावं.

केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com