Vijay Wadettiwar News : भाजप मंत्र्यांच्या कन्येला सरकारी योजनेत कोट्यवधींची सबसिडी, विजय वडेट्टीवार यांची सडकून टीका

Political News : भाजप नेते आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या पत्नीच्या कंपनीला देखील अशीच सबसिडी नुकतीच मिळाली आहे.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar Saam TV

Mumbai News :

राज्याचे विरोध पक्षनेते विजय वडेट्टीवार सध्या जबरदस्त अॅक्टिव्ह झाले आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते, मंत्री विजयकुमार गावित यांच्या मुलीला सरकारी फायदा मिळाल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. जिथे लाभ, तिथे भाजप परिवार असा टोलाही त्यांना लगावला आहे.

किसान संपदा योजनेअंतर्गत विजयकुमार गावित यांची मुलगी सुप्रिया गावित यांना फायदा करुन दिल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. वडील मंत्री, एक मुलगी खासदार, दुसरी मुलगी केंद्र सरकारच्या योजनेत लाभार्थी. हाच परिवारवाद पंतप्रधान मोदींना संपवायचा आहे का?  (Latest Marathi News)

Vijay Wadettiwar
Kolhapur News : गोकुळ दूध संघाची आज वार्षिक सभा, जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता; काय असतील विषय?

ना खाऊंगा ना खाने दुंगाचा ढोल वाजवत मते घेणाऱ्या सरकारने जनतेसाठी काम करायचे असते. भाजपचे मंत्री आणि त्यांच्या मुलांसाठी नाही. २०२३ मध्ये मोदी सरकारचा नारा बदलून 'तुम भी खाओ मैं भी खाऊंगा' असे झाले काय? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे. (Political News)

योजना शेतकऱ्यांची लाभार्थी यादी भाजप मंत्र्यांची. किसान संपदा योजनेअंतर्गत केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने कृषी प्रक्रिया क्लस्टर प्रकल्पांना सबसिडी दिली आहे. ह्यात मुख्य लाभार्थी भाजप नेते आणि मंत्री विजय गावित यांची मुलगी आहे. सुप्रिया गावित यांच्या "रेवा तापी औद्योगिक विकास" कंपनीला १० कोटींची सबसिडी मिळाली आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

Vijay Wadettiwar
Saamana Editorial: 'जवानांच्या रक्ताचे सडे पडत असताना, राज्यकर्त्यांवर फुलांची उधळण... PM नरेंद्र मोदींवर 'सामना'तून हल्लाबोल

भाजप नेते आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या पत्नीच्या कंपनीला देखील अशीच सबसिडी नुकतीच मिळाली आहे. किसान संपदा योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आहे. योजनेचा लाभ मात्र भाजप नेते घेत आहे. योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढले नाही, भाजपात भरती झालेल्या नेत्यांचे उत्पन्न कोटींनी वाढले हे मात्र खरे आहे, असा टोलाही विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com